माणूस म्हणून घ्यायची आपली लायकी नाही; मणिपूर घटनेवर हरभजन सिंग, शिखर धवनचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:18 PM2023-07-20T21:18:15+5:302023-07-20T21:19:58+5:30
भारताचा माजी फिरकीपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग आणि भारताचा सलामीवीर शिखर धवन यांनी मणिपूरच्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
Manipur incident - भारताचा माजी फिरकीपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग आणि भारताचा सलामीवीर शिखर धवन यांनी दोन मणिपुरी महिलांची नग्न परेड करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांना "फाशीची शिक्षा" देण्याची मागणी केली आहे. मणिपूरमध्ये बुधवारी ४ मे रोजी एक व्हिडिओ समोर आल्यानंतर तणाव वाढला आहे.
"मी रागावलो आहे असे म्हटले तर ते अधोरेखित आहे. रागाने मी सुन्न झालो आहे. मणिपूरमध्ये जे घडले त्यानंतर आज मला लाज वाटते. जर या भयंकर गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली गेली नाही, तर आपण स्वत:ला माणूस म्हणणे बंद केले पाहिजे,''असे भज्जी म्हणाला. हरभजन हा क्रीडा वर्तुळातून प्रतिक्रिया देणारा पहिला खेळाडू ठरला. शिखर धवननेही ट्विट करून त्या महिलांसाठी न्याय मागितला आहे.
Justice must prevail for the women in Manipur. Authorities must take swift action to punish the culprits responsible for this heinous act. Stronger measures to be implemented to prevent such tragedies in the future. #JusticeForManipurWomen#EndViolence#WomenSafety
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 20, 2023
मणिपूरमधील पोलिसांनी सांगितले की, अज्ञात सशस्त्र व्यक्तींविरुद्ध थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
मणिपूरमध्ये ३ मे रोजी वांशिक हिंसाचार सुरू झाल्यापासून १५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जखमी झाले आहेत, जेव्हा मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित करण्यात आला होता. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे ५३ टक्के मेईटीस आहेत आणि ते मुख्यतः इंफाळ खोऱ्यात राहतात, तर आदिवासी लोक, ज्यात नागा आणि कुकी आहेत ते ४० टक्के आहेत आणि ते मुख्यतः डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.