"मला माझ्या मुलाचा अभिमान..."; अनंत अंबानींनी १७० किमी पदयात्रा पूर्ण केल्यावर नीता अंबानींनी व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:59 IST2025-04-06T12:58:32+5:302025-04-06T12:59:55+5:30
अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका हा १७० किमीचा प्रवास पूर्ण केला आहे.

"मला माझ्या मुलाचा अभिमान..."; अनंत अंबानींनी १७० किमी पदयात्रा पूर्ण केल्यावर नीता अंबानींनी व्यक्त केला आनंद
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी रविवारी गुजरातमधील जामनगर ते द्वारका असा १७० किमीचा प्रवास पूर्ण केला. अनंत अंबानी यांच्या आई आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, अनंत अंबानी त्यांच्या कुटुंबासह द्वारकाधीश मंदिरात पोहोचले आहेत.
"जामनगर ते द्वारका ही पदयात्रा पूर्ण केल्याबद्दल मुलाचा अभिमान आहे. एक आई म्हणून, माझा धाकटा मुलगा अनंत द्वारकाधीशाच्या या दिव्य स्थानाची पदयात्रा पूर्ण करत असल्याचे पाहणे खूप अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या १० दिवसांपासून, अनंतच्या पदयात्रेत सहभागी असलेले सर्व तरुण आपल्या संस्कृतीचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. मी भगवान द्वारकाधीशांना अनंतला शक्ती देण्याची प्रार्थना करते, असंही नीता अंबानी म्हणाल्या.
'दुकानदारी'च्या विधानंतर पियुष गोयल यांची स्टार्टअप्ससाठी मोठी घोषणा, म्हणाले यापुढे...
अनंत अंबानी यांच्या पत्नी राधिका मर्चंट यांनी सांगितले की, लग्नानंतर अनंत यांना पदयात्रेला जायचे होते. आज अनंत यांचा ३० वा वाढदिवस आहे. आमच्या लग्नानंतर ही पदयात्रा करण्याची त्यांची इच्छा होती. आज आपण त्यांचा वाढदिवस येथे साजरा करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.
शेवटच्या दिवशी पत्नी राधिका मर्चंट आणि आई नीता अंबानी देखील पदयात्रेत सहभागी झाल्या. अनंत अंबानी यांना पदयात्रेदरम्यान ज्यांनी त्याला साथ दिली त्यांचे आभार मानले. 'हा माझा स्वतःचा आध्यात्मिक प्रवास आहे. मी ते देवाच्या नावाने सुरू केला आणि त्यांच्या नावानेच संपवीन. मला भगवान द्वारकाधीशांचे आभार मानायचे आहेत. माझ्या आध्यात्मिक प्रवासात माझ्यासोबत असलेल्यांचा मी आभारी आहे. माझी पत्नी आणि आई देखील माझ्यासोबत आहेत, असंही अनंत अंबानी म्हणाले.