छोटा राजनला भारतात आणण्याची तयारी सुरू

By admin | Published: October 28, 2015 10:11 PM2015-10-28T22:11:29+5:302015-10-28T22:11:29+5:30

गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियात पकडण्यात आल्यानंतर आता त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मुंबई पोलिसांकडून छोटा राजनची फाईल मागितली

I am ready to bring Chhota Rajan to India | छोटा राजनला भारतात आणण्याची तयारी सुरू

छोटा राजनला भारतात आणण्याची तयारी सुरू

Next

नवी दिल्ली : गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियात पकडण्यात आल्यानंतर आता त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मुंबई पोलिसांकडून छोटा राजनची फाईल मागितली असून एकूणच छोटा राजनच्या प्रत्यार्पणासाठी किमान वीस दिवस लागू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
छोटा राजनला पकडण्यात आल्यापासूनच केंद्र सरकार मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहे. मुंबईत छोटा राजनविरुद्ध ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. प्रत्यार्पणासाठी किमान महिन्याचा कालावधी लागू शकतो असे या अधिकाऱ्याने सांगितले.
राजन म्हणतो, भारतात धोका
आपण भारतात जाऊ इच्छित नाही. कारण तेथे आपल्या जिवाला धोका आहे. त्यामुळे मला झिम्बाब्वेत पाठवावे अशी विनंतीही राजनने केली इंडोनेशियन पोलिसांना केली आहे. राजनला किमान वीस दिवसांच्या आत भारताच्या ताब्यात द्यावे लागेल. कारण राजन ही भारतीय व्यक्ती आहे, असे सूत्रांनी सांगितले.
‘दाऊद काय मी कोणालाही भीत नाही...’
बाली (इंडोनेशिया) : दाऊद इब्राहीमसह इतर शत्रू टोळ्यांकडून असलेल्या धोक्याला आपण भीत नाही, असे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने म्हटले आहे. राजनच्या जिवाला धोका असल्यामुळे इंडोनेशियन पोलिसांनी त्याला विशेष कमांडो संरक्षण दिले आहे.
दाऊदच्या टोळीसह इतर शत्रू टोळ्यांकडून तुझ्या जिवाला धोका आहे. त्याची तुला भीती वाटते काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी भीत नाही’, असे उत्तर राजनने दिले. आॅस्ट्रेलियाहून रविवारी इंडोनेशियामध्ये आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलीस राजनला घेऊन जात असताना पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारले

Web Title: I am ready to bring Chhota Rajan to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.