मोदीजी, मिठाई पाठवली म्हणून मत देणार नाही, ममता यांची गुगली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 07:50 PM2019-04-24T19:50:08+5:302019-04-24T19:51:51+5:30

अनेक सणांमध्ये मी लोकांना मिठाई आणि गिफ्ट पाठवत असते. मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पूजा असते त्या काळात गिफ्ट पाठवते

I am sending sweet but will Not vote to Modi Says Mamta Banajree | मोदीजी, मिठाई पाठवली म्हणून मत देणार नाही, ममता यांची गुगली 

मोदीजी, मिठाई पाठवली म्हणून मत देणार नाही, ममता यांची गुगली 

Next

हुगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला दरवर्षी कुर्ते आणि मिठाई पाठवतात. यावर ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, अनेक सणांमध्ये मी लोकांना मिठाई आणि गिफ्ट पाठवत असते. मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पूजा असते त्या काळात गिफ्ट पाठवते, चहा पाजते मात्र त्यांना एकही मत देणार नाही असा टोला ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. कोलकत्ता येथील हुगली येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. विशेष म्हणजे मोदींची ही मुलाखत अभिनेता अक्षय कुमारनं घेतली. या मुलाखतीतून मोदींनी आयुष्यातले अनेक पैलू उलगडले आहेत. यावेळी मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दरवर्षी मला एक-दोन कुर्ते पाठवतात, याचीही आठवण मोदींनी करून दिली होती.  

मी फार लहान वयात घर सोडलं. कारण तेव्हाचं जीवन वेगळंच होतं. केव्हा केव्हा कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्याची इच्छा व्हायची, तेव्हा आईला बोलावून घ्यायचो, परंतु नंतर आईच बोलायची की मी इथे काय करणार, मी परत जाते. मोदी म्हणाले, माझ्याकडे जेव्हा आई येते, तेव्हा तिला वेळ देता येत नाही. एखाद दुसऱ्या वेळी फक्त तिच्याबरोबर जेवण होते. जर एखादी घटना मला न आवडल्यास मी ती कागदावर लिहितो. ती घटना का झाली, त्यानंतर तो कागद फेकून देत होतो. परंतु तरीही मनाला काही शांती मिळत नव्हती. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी ती घटना कागदावर उतरवत राहतो आणि कागद फाडून टाकतो. तेव्हा मीसुद्धा चुकीचा असल्याचं कळत होतं.
 

Web Title: I am sending sweet but will Not vote to Modi Says Mamta Banajree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.