"मी लष्कराच्या कमांडरला युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले"; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:37 PM2024-09-06T13:37:38+5:302024-09-06T13:39:36+5:30
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती पाहता भारत आणि जगात शांतता राखण्यासाठी आपण युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे, असे मी लष्कराला सांगितले.
'भारत नेहमीच शांततेचा उपासक राहिला आहे आणि राहील, सध्याची जागतिक परिस्थिती पाहता आपण युद्धासाठी सदैव तयार असले पाहिजे, असे मी लष्कराच्या कमांडरना सांगितले, असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. आज राजनाथ सिंह यांनी माध्यमांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
माध्यमांसोबत बोलताना सिंह म्हणाले, "जगातील भारत हा एकमेव देश आहे या देशाने 'वसुधैव कुटुंबकम'चा संदेश दिला आहे. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. भारत नेहमीच शांतीचा उपासक आहे, होता आणि राहील. पण आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार करून मी माझ्या लष्कराच्या कमांडर्सना सांगितले होते की, जगात आणि भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण सदैव युद्धासाठी तयार असले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपली शांतता भंग पावू नये.
आता राजकीय 'दंगल' होणार! विनेश फोगट करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, 'या' जागेवरून निवडणूक लढवणार?
काही दिवसापूर्वी लखनौमध्ये लष्कर कमांडर्सची परिषद झाली, यावेळी सिंह यांनी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष आणि बांगलादेशातील सद्यस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी कमांडरना या घटनांचे विश्लेषण करण्यासाठी, भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या समस्यांचा अंदाज घ्या आणि सामोरे जाण्यासाठी तयार रहा. उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि शेजारील देशांमधील घडामोडी लक्षात घेऊन सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सर्वसमावेशक आणि सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.
राजनाथ सिंह म्हणाले, “जागतिक अस्थिरता असूनही, भारत तुलनेने शांततेच्या वातावरणात शांततेने विकसित होत आहे. मात्र, आव्हानांच्या वाढत्या संख्येमुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे. अमृतकाळात आपण आपली शांतता राखणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, वर्तमानात आपल्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि भविष्याभिमुख होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत राष्ट्रीय सुरक्षा घटक असणे आवश्यक आहे. आपच्याकडे अतुलनीय प्रतिकार क्षमता असली पाहिजे, असंही सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहनही लष्करी नेतृत्वाला केले. "हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग युद्धाचा मार्ग ठरवत असतो, असंही राजनाथ सिंह म्हणाले.
#WATCH | Lucknow, Uttar Pradesh: Union Defence Minister Rajnath Singh says, "India is the only country in the world that has given the message of 'Vasudhaiva Kutumbakam'. India has always advocated for peace...But today given the geopolitical situation, I told the army that to… pic.twitter.com/K8AJEsUVi4
— ANI (@ANI) September 6, 2024