"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:28 PM2024-12-04T12:28:12+5:302024-12-04T12:32:25+5:30
व्यवस्थित हिंदी न बोलल्यामुळे विरोधकांनी खिल्ली उडवल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुनावलं.
लोकसभेत बोलताना केंद्रीय अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन या हिंदी बोलताना चुकल्या. त्यावरून विरोधकांनी खिल्ली उडवली. मी हिंदी शिकलेच नाही, कारण माझ्या राज्यात हिंदी शिकणे गुन्हा केल्यासारखं वाटते. मला हिंदी शिकूच दिली नाही, असे म्हणत निर्मला सीतारामन यांनी विरोधकांना उत्तर दिले.
विरोधकांनी हिंदीवरून उडवली खिल्ली, सीतारामन भडकल्या
लोकसभेत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री "राजीव रायजी, मला खूप दुःखाने सांगवं लागत आहे. ते म्हणाले की, मी तुम्हाला चिठ्ठी लिहिली आहे (मैने चिठ्ठी लिखी हूँ आपको) आणि तुमच्याकडून उत्तर मिळाले नाही." लिखी हूँ शब्दावरून विरोधकांनी खिल्ली उडवली.
त्यानंतर निर्मला सीतारामन यांचा चढला. त्या म्हणाल्या, "इथे प्राध्यापक आहेत, कुणीतरी इंग्रजी दुरुस्त करा, कुणी माझी हिंदी दुरुस्त करा. पण, तुमचे राजकीय तत्त्वज्ञान मला तुम्हाला सांगावं लागेल."
पुढे त्या म्हणाल्या की, "सदस्यने चिठ्ठी लिखी है, लिख्खी है, लुख्खा है, काय असेल... मी लक्ष देत नाही. मी माझ्या हिंदीची मजाक करतेय. कारण मी अशा राज्यातून येतेय... तुम्ही विरोधी पक्षात बसलेले आहात ना, तुम्ही जरूर विचारा. मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणे गुन्हा वाटतो."
Union Finance Minister Nirmala Sitharaman -
— News Arena India (@NewsArenaIndia) December 3, 2024
"I come from a state where learning Hindi is considered a crime so I was never allowed to learn Hindi."
pic.twitter.com/TlyJE7dEjm
"मला लहानपणापासून हिंदी शिकण्यापासून मला रोखलं गेलं. तुमचं भांडणं त्यांच्याशी असायला हवं, माझ्याशी नाही, जे हिंदी शिकणे म्हणजे संकट समजतात. माझ्याशी का भांडता आहात", असे उत्तर निर्मला सीतारामन यांनी विरोधकांना दिले.