मी पंतप्रधानांच्या आईला रांगेत उभं राहूच दिलं नसतं - आझम खान
By admin | Published: November 16, 2016 11:19 AM2016-11-16T11:19:53+5:302016-11-16T11:18:39+5:30
पंतप्रधानांची आई नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या आहेत हे कळलं असतं, तर मी स्वत: रांगेत उबं राहून त्यांना नोटा बदलून दिल्या असत्या, असे सपा नेते आझम खान म्हणाले.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १६ - काळ्या पैशाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला देशवासियांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या या निर्णयानंतर अनेक लोक नोटा बदलून घेण्यासाठी बँकाबाहेर रांगेत उभे आहेत. सर्वसामन्यांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांनीही काल बँकेबाहेर रांग लावून नोटा बदलून घेतल्या. त्यांच्या या कृतीचे अनेकांना कौतुक केले तर काहींनी त्यावर टीकाही केली.
वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनीही या मुद्यावर भाष्य केले आहे. ' पंतप्रधानांची आई बँकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढणार आहे, हे माहिती असते तर मी नक्कीच त्यांची मदत केली असती' असे त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ' पंतप्रधान मोदींची आई नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या आहेत हे मला माहीत असतं, तर मीच रांगेत उभं राहून त्यांना पैसे काढून दिले असते. पण त्यांना असं रांगेत (ताटकळत) उभं राहू दिलं नसतं' असे ते म्हणाले. यावेळी आझम खान यांनी बँकेत नोटा बदलण्यासाठी गेलेल्यांच्या बोटावर शाई लावण्याच्या सरकारच्या निर्णयावरही भष्य केले. ' जे लोक बँकेत काळा पैसा बदलून घेण्यासाठी येत आहेत, त्यांच्या चेह-यालाच काळं फासलं पाहिजे. म्हणजे ते पुन्हा घराबाहेर पडण्याचा विचारही करू शकणार नाहीत' असेही आझम खान यांनी नमूद केले.
गांधी नगरमधील रायसेन परिसरातील 'ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स' येथे पंतप्रधानांच्या आई हीराबेन यांनी चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा रांग लावून बदलून घेतल्या. बँकेबाहेर सर्वसामान्यांप्रमाणे रांग लावून हीराबेन यांनी त्यांचा मुलगा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. हीराबेन यांनी 4,500 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्या.
Mujhe pata hota ki PM ki Mataji line mein lag rahi hain toh main khud jakar lagta,unhe nhi jaane deta: Azam Khan #DeMonetisationpic.twitter.com/xp41OHhZ9x
— ANI UP (@ANINewsUP) 16 November 2016
Those coming to banks with black money should have their faces blackened, so they don't come again,they won't step out of house: Azam Khan pic.twitter.com/qgXJrUN3f1
— ANI UP (@ANINewsUP) 16 November 2016