सात नसेल पण एका गोळी­ची तयारी ठेवायला हवी, मुर्दाडपणे जगण्यापेक्षा बोलायलाच  हवे - कलाकारांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 04:06 PM2017-09-07T16:06:51+5:302017-09-07T16:09:58+5:30

‘सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरुपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करुन संतापाला वाट करुन दिली

I deserve at least 1 bullet if not 7 | सात नसेल पण एका गोळी­ची तयारी ठेवायला हवी, मुर्दाडपणे जगण्यापेक्षा बोलायलाच  हवे - कलाकारांची भावना

सात नसेल पण एका गोळी­ची तयारी ठेवायला हवी, मुर्दाडपणे जगण्यापेक्षा बोलायलाच  हवे - कलाकारांची भावना

Next
ठळक मुद्देगौरी लंकेश यांची हत्या ही दु­र्देवी आणि संतापजनक घटना असून, समाज कोणत्या दिशेने चालला आहेस्व­त:चे विचार परखडपणे मांडणा-यांचा जीव आता सुरक्षित नाही, त्यां­ची जीवनयात्रा संपवण्­याचा प्रयत्न केला जात आहे

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : ‘सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?’, ‘बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बोलता मुर्दाड जिणं जगायचं असेल तर मला बोलायलाच हवं’, ‘अज्ञातांकडून आणखी एका पुरोगामी आवाजाचा अंत’ अशा स्वरुपात कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करुन संतापाला वाट करुन दिली आहे. गौरी लंकेश यांची हत्या ही दु­र्देवी आणि संतापजनक घटना असून, समाज कोणत्या दिशेने चालला आहे, याबाबत कलाकारांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका गौरी लंकेश यांची मंगळ­वारी राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी सात गोळया झाडून हत्या केली. पुरोगामी विचारांच्या पुरस्कर्त्या म्हणून गौरी लंकेश यां­ची ओळख आहे. प्रस्थापितांना लेखणीतून झोडप­ण्याचा त्यांचा प्रयत्न आणि आवाज यानिमित्ताने दाबण्यात आला आणि सोशल मीडियावर निषे­धाची लाट उसळली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पान­सरे, कलबुर्गी यांच्या नंतर लंकेश यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कलाकारांनीही याविरोधात बंड पुकारले असून सोशल मीडियावरुन त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. विवेकाला विवेकाने उत्तर न देता बंदुकीचा वापर करणा-यांचा निषेध नोंदवला जात असून, त्यांचे लेखन थांबले तरी त्यांचे वि­चार थांबणार नाहीत, हे सत्र आपण किती दिवस सहन करणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी ‘तुम्ही माझ्­या पोस्ट्स, लेख वाचता. सात नसेल पण निदान एका गोळीची तरी मी तयारी ठेवायला हवी नं ?  मला वाटतं हो, ठेवायला हवी. ब-याच जणां­नी तशी तयारी ठेवायला हवी असं दिसतंय...’ अशा शब्दांत लंकेश यांच्या हत्येबाबत फेसबूकवर मराठी आणि इंग्रजीत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. स्व­त:चे विचार परखडपणे मांडणा-यांचा जीव आता सुरक्षित नाही, त्यां­ची जीवनयात्रा संपवण्­याचा प्रयत्न केला जात आहे, तरी आपण बोलत रहायला हवे, या विचारांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. अनेकजणांनी ही पोस्ट शेअर केली असून खूपजणांनी याबाबत निर्भिडपणे आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.

अभिनेता जितेंद्र जोशीने ‘मी एफबी आणि टिव­टर बंद केलं होतं. का­रण भाषावाद, प्रांतवाद आणि हिंदी/मराठी भा­षेविषयी जातीविषयी आपापली टोकाची मतं लोक व्यक्त करताना पाहात होतो. परंतु काल आणखी एक गोळी झाड़ली गेली आणि विचार संपवण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. मला बोललं पाहिजे. कारण बोलल्याने हत्या होणार असेल आणि न बो­लता मुर्दाड जीणं जगा­यचं असेल तर मला बोला­यलाच हवं . निदान काही लोकांनी तरी. सहमत असाल तर हे पोहोचू दया अन्यथा शिव्या शाप आहेतच लोकांकडे’, अशा स्वरुपात भावना व्यक्त करत अतुल कुलकर्णी यांची पोस्टही शेअर केली आहे.

जितेंद्रने ‘इतनी आवाजें अनगिनत इच्छाएँ, पल पल का बैर घड़ी घड़ी का बखेड़ा’ ही स्वलिखित कविता फेसबूक अकाऊंटवर शेअर करत समाजातील सद्यस्थिती चे समर्पक वर्णन केले आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही ‘आ­णखी एका पुरोगामी आवा­जाचा अज्ञातांकडून अं­त’ अशा शब्दांत फेसबू­कवर संताप व्यक्त केला आहे. गौरी लंकेश यांच्या आत्म्यास शांती लाभो! दाभोलकर, पानस­रे, कलबुर्गी यांची हत्या कोणी केली? आपल्याला कधी तरी हे कळणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: I deserve at least 1 bullet if not 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.