‘‘ते पुरावे असलेले मोबाईल फोन मीच नष्ट केले’’, मनीष सिसोदियांची कबुली, आरोपपत्रात सीबीआयचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 08:06 PM2023-05-27T20:06:33+5:302023-05-27T20:07:15+5:30
Manish Sisodia: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुरावे असलेले दोन मोबाईल फोन नष्ट केले, असे कबूल केल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रातून केला आहे.
दिल्लीतील आबकारी धोरण प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुरावे असलेले दोन मोबाईल फोन नष्ट केले, असे कबूल केल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रातून केला आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशिटमधील माहितीनुसार १ जानेवारी २०२० पासून १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत सिसोदिया यांनी तीन मोबाईल फोनचा वापर केला. यामधील दोन फोन २२ जुलै २०२२च्या आधी वापरण्यात आले होते. तसेच मनीष सिसोदिया यांनी हे दोन्ही फोन नष्ट केल्याची बाब कबूल केली आहे.
सीबीआयने आपल्या आरोपपत्रात सांगितले की, हे मोबाईल जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले होते. तसेच त्यामध्ये उत्पादन शुल्क नीतीशी संबंधित पुरावे होते. यामध्ये हेही सांगण्यात आले की, सिसोदियांविरोधात खटला चालवण्यासाठी हा आणखी एक पुरावा आहे.
सीबीआयने आरोपपत्रात सांगितले की मनीष सिसोदिया यांनी आपण दोन मोबाईल नष्ट केल्याचे कबूल केले आहे. हे मोबाईल जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले. तसेच त्यामध्ये आबकारी नीतीबाबत गंभीर पुरावे होते. आरोपपत्रात पुढे सांगण्यात आले की, सिसोदिया जीओएमच्या (मंत्र्यांचा समूह) रिपोर्टचे मुख्य रचनाकार होते. तसेच गुन्हेगारी कट रचून खासगी घाऊक विक्रेत्यांना उच्च मार्जिनच्या माध्यमातून बेकायदेशीर लाभ देण्यात आला.