उरी हल्ल्यानंतर मला झोप लागत नव्हती - मनोहर पर्रीकर

By admin | Published: October 6, 2016 02:55 PM2016-10-06T14:55:00+5:302016-10-06T15:08:33+5:30

मी सरळ विचार करतो पण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आला तर वाकडाही विचार करु शकतो असं केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बोलले आहेत

I did not have to sleep after Uri attacked - Manohar Parrikar | उरी हल्ल्यानंतर मला झोप लागत नव्हती - मनोहर पर्रीकर

उरी हल्ल्यानंतर मला झोप लागत नव्हती - मनोहर पर्रीकर

Next
ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 6 - मी सरळ विचार करतो पण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आला तर वाकडाही विचार करु शकतो असं केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बोलले आहेत. भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकनंतर पहिल्यांदाच मनोहर पर्रीकरांनी जाहीर भाषण केलं. यावेळी बोलताना पर्रीकरांनी सर्जिंकल स्ट्राईकमध्ये एकही जवान शहिद झाला नाही, हे असं फार कमी वेळा होतं असं सांगत लष्कराच्या जवानांचं कौतुक केलं. उत्तरप्रदेशमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मनोहर पर्रीकरांनी उपस्थिती लावली.
 
मोदींच्या नेतृत्तवात देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, तुम्ही चिंता करु नका असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. लष्कराच्या शौर्यावर आजपर्यंत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं नव्हतं, पण पहिल्यांदा काही लोक करत आहेत असं सांगत मनोहर पर्रीकरांनी विरोधकांवर टीका केली. उरी हल्ल्यानंतर मला झोप लागत नव्हती, सर्जिकल स्ट्राईक झाली त्यादिवशीही मला झोप लागली नाही असं पर्रीकरांनी सांगितलं आहे. 
 
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान वारंवार युद्धाची भाषा करत होता. त्यानंतर मला काही माजी सैनिकांचे ई-मेल्स आले. यामध्ये त्यांनी तुम्ही चिंता करुन करा गरज असल्यास युद्धासाठी सीमेवर येण्यास आम्ही तयार आहोत असं सांगितलं असल्याचं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. 
 
संरक्षणमंत्री असल्याने आपल्या बोलण्याचा मर्यादा आहेत सांगत पर्रीकरांनी भाषण थांबवलं. मात्र त्याआधी संरक्षणमंत्री म्हणून मोदींच्या नेतृत्वात जे करावं लागेल ते सर्व करणार असल्याचं आश्वासनही मनोहर पर्रीकरांनी यावेळी दिलं.
 
उत्तरप्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपाने तर मुख्यालयात नरेंद्र मोदी आणि मनोहर पर्रीकरांचा लष्कराच्या जवानांसोबत फोटो लावून अभिनंदनही केलं आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. मात्र या वादात केंद्रीय मंत्र्यांनी न पडता बोलताना काळजी घेण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं होतं. 

Web Title: I did not have to sleep after Uri attacked - Manohar Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.