मी असे बोललोच नाही; लालूप्रसादांचे घूमजाव
By Admin | Published: March 25, 2015 01:26 AM2015-03-25T01:26:02+5:302015-03-25T01:26:02+5:30
बिहारमधील शाळांतील सामूहिक कॉपीचे समर्थन करणारे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी आपल्या या विधानावरून घूमजाव केले.
पाटणा : माझे सरकार असते तर परीक्षेत मुलांना कॉपी करण्यासाठी मी पुस्तके दिली असती, असे सांगून बिहारमधील शाळांतील सामूहिक कॉपीचे समर्थन करणारे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी आपल्या या विधानावरून घूमजाव केले. मी असे बोललोच नाही. कॉपी कुणाचीही मदत करू शकत नाही, असे मी म्हणालो होतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा खुलासा लालूंनी केला.
बक्सर जिल्ह्यात एका नव्या शाळेचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचलेल्या लालूप्रसाद यादव यांनी आपल्या खुमासदार शैलीत कॉपी प्रकरणाची टर उडविली होती. माझे सरकार असते तर विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी पुस्तकच नेण्याची परवानगी दिली असती, असे ते म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका झाल्यानंतर लालूंनी याबाबत खुलासा केला. (वृत्तसंस्था)