'रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर मी बसलोच नाही, पंडीत नेहरुच बसले होते'
By महेश गलांडे | Published: February 10, 2021 09:55 AM2021-02-10T09:55:51+5:302021-02-10T09:57:37+5:30
अमित शाह यांनी आरोप फेटाळून लावताना रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व भारती विद्यापीठाच्या पत्राचाही उल्लेख केला. “अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी बोलताना मी शांतीनिकेतन दौऱ्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसल्याचं सांगितलं.
नवी दिल्ली - भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्त्वाची परवानगी देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १ कोटी २५ लाख म्हणजेच सुमारे १ टक्का भारतीय नागरिक परदेशात राहात आहेत. तसेच गेल्या ५ वर्षांमध्ये ६ लाख ७३ हजार जणांनी भारतीय नारिकत्त्वाचा त्याग केल्याची माहितीही गृहमंत्रालयाने लोकसभेत सादर केली. यावेळी, केंद्रीय गृहमंत्री यांनी, पश्चिम बंगाल दौऱ्यात शांतीनिकेतनला भेट दिल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर आपण बसल्याला आरोप फेटाळला असून याबाबत स्पष्टीकरण दिले.
Adhir Ranjan Chowdhury said during his speech yesterday that I sat on Rabindranath Tagore’s seat during my visit to Santinikलetan. I have a letter from VC of Visva Bharti where he clarified that no such incident happened, I sat near a window where anyone can sit: HM Amit Shah pic.twitter.com/R28JI5RAqq
— ANI (@ANI) February 9, 2021
रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर आपण बसल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी अमित शाह यांच्यावर हा आरोप केला होता. गेल्या महिन्यात २० जानेवारीला पश्चिम बंगाल दौऱ्यावेळी अमित शाह यांनी विश्वभारती विद्यापीठाला भेट दिली तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांच्या जागी बसून अनादर केला होता असा आरोप अधीर रंजन चौधरी यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांवर अमित शाह यांनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, यापूर्वी कोणते नेते त्या जागेवर बसले होते, आणि कोणाकोणाचे फोटो आहेत, हेही बालून दाखवले.
अमित शाह यांनी आरोप फेटाळून लावताना रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व भारती विद्यापीठाच्या पत्राचाही उल्लेख केला. “अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी बोलताना मी शांतीनिकेतन दौऱ्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसल्याचं सांगितलं. माझ्याकडे विश्वभारतीच्या कुलगुरूंचं पत्र आहे ज्यामध्ये त्यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी खिडकीजवळ बसलो होतो जिथे कोणीही बसू शकतं,”, असं अमित शहा यांनी सांगितलं.
पंडित नेहरु अन् राजीव गांधीच बसले होते
माजी पंतप्रधान आणि काही काँग्रेस नेत्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागी बसल्याचा आरोप अमित शाह यांनी केला. “माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान राजीव गांधी त्या ठिकाणी बसले होते. मी रवींद्रनाथ टागोरांच्या जागी बसलो नव्हतो पण माझ्याकडे दोन फोटो आहेत ज्यामध्ये पंडित नेहरु आणि राजीव गांधी हेही त्या जागी बसलेले दिसत आहेत,” असे म्हणत शाह यांनी फोटेदेखील सादर केले.