अहमद पटेल हरणार, मग त्यांना कशाला मत देऊ ?- शंकरसिंह वाघेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 11:26 AM2017-08-08T11:26:24+5:302017-08-08T14:06:47+5:30
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान सुरु आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांच्या उमेदवारीमुळे भाजपा आणि काँग्रेस दोघांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
सूरत, दि. 8 - गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान सुरु आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांच्या उमेदवारीमुळे भाजपा आणि काँग्रेस दोघांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गुजरातमधून अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखण्यासाठी भाजपाने जोरदार फिल्डिंग लावली आहे तर, अहमद पटेल यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसने आपली सर्व ताकत पणाला लावली आहे.
दरम्यान मतदान सुरु असतानाच शंकरसिंह वाघेला यांनी अहमद पटेल यांच्या पराभवाची भविष्यवाणी केली आहे. मी अहमद पटेल यांना मत दिलेले नाही. पराभूत होणा-या उमेदवाराला कोण मत देईल असे सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे अहमद पटेल यांच्या विजयाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी अहमद पटेल यांना 45 मतांची आवश्यकता आहे. सध्या काँग्रेसकडे 44 आमदारांची मते आहेत. फक्त एक मत अहमद पटेल यांच्या जय-पराजयात महत्वपूर्ण ठरणार आहे.
अहमद पटेल हे काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतले नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अशी त्यांची ओळख आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक आणि विविध राज्यातील सत्तास्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखून वर्षअखेरीस होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनिती आहे.
{{{{twitter_post_id####
#Gujarat#RajyaSabhaPolls polls: After Vaghela jolt, two Congress MLAs admit voting for BJP
— ANI Digital (@ani_digital) August 8, 2017
Read @ANI_news story -> https://t.co/IgFNi17ws8pic.twitter.com/xHuP7Ri2a3
काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या शंकरसिंह वाघेला यांनी अहमद पटेल यांना 40 मते सुद्धा पडणार नाहीत असे भाकीत वर्तवले आहे. जे आमदार काँग्रेससोबत आहेत ते सुद्धा पटेल यांना मतदान करणार नाहीत असे शंकरसिंह वाघेला यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला फुटल्यानंतर काँग्रेसच्या आणखी सहा आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपर्यंत आणखी पडझड होऊ नये म्हणून काँग्रेसला उर्वरित 44 आमदारांना बंगळुरुतल्या रिसॉर्टमध्ये ठेवावे लागले. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
44 आमदारांपैकी कोणी क्रॉस व्होटिंग किंवा नोटाचा पर्याय वापरला नाही तर, काँग्रेसला अहमद पटेल यांच्या विजयासाठी फक्त एका आमदाराच्या पाठिंब्याची गरज भासेल.
तीन जागांसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. शहा आणि इराणी वगळता भाजपाने बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांनी अलीकडेच काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला. पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेस गुजरात विधानसभेतील राष्ट्रवादीचे दोन आमदार, संयुक्त जनता दल आणि गुजरात परिवर्तन पार्टीच्या प्रत्येकी एका आमदारावर अवलंबून आहे. कुठल्या पक्षाला पाठिंबा देण्यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी सांगितले.
}}}}Jadeja (Kandhal Jadeja) ji is first time MLA, he is innocent. Our vote is for UPA:Jayant Patel,NCP #Gujarat#RajyaSabhaPollspic.twitter.com/72inJcapWf
— ANI (@ANI_news) August 8, 2017
अहमद पटेल उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी आणि जदयूचा आमदार त्यांच्यासोबत होता. काँग्रेसच्या 51 आमदारांपैकी सात आमदार बंगळुरुला गेले नव्हते. हे आमदार वाघेल यांच्या गटातील असून त्यांच्यापैकी एक आमदार मदत करेल असा काँग्रेसला विश्वास आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे 57 आमदार होते. त्यातील सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 51 झाले.