मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!
By admin | Published: July 13, 2017 12:25 AM2017-07-13T00:25:37+5:302017-07-13T00:25:37+5:30
सीबीआयने जे छापे घातले, ते प्रकरण 2004 सालचे आहे.
एस. पी. सिन्हा।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : सीबीआयने जे छापे घातले, ते प्रकरण 2004 सालचे आहे. त्यावेळी मी १३-१४ वर्षांचा होतो. मला मिशीही फुटली नव्हती. इतक्या वयाचा मुलगा राजकीय षडयंत्र रचून भ्रष्टाचार कसा करू शकेल, असा सवाल करीत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद यादव यांनी बुधवारी माझ्या मंत्रिपदाच्या काळात संबंधित तिन्ही खात्यांमध्ये काही घोटाळा वा भ्रष्टाचार झाला असेल, तर सांगा, असे आव्हान विरोधकांना दिले.
बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते आणि त्यांचे बंधू व मंत्री तेजप्रताप यादव हे दोघेही होते. ते येताच पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पण काही न बोलता ते निघून गेले. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मी माझी कर्तव्ये आणि तिन्ही खात्यांचा कारभार व्यवस्थित करीत आहे. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, असे सांगत, आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सूचित केले.