मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, देवेंद्र फडणवीसांचा खडसेंना थेट टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 04:26 PM2020-09-11T16:26:50+5:302020-09-11T16:35:19+5:30

खडसेंच्या सातत्याच्या आरोपावर आणि टोमण्यांवरु देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांच एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. तसेच, खडसेंचं जाहीरपणे पक्षाविरोधात, पक्षातील नेत्यांविरुद्ध बोलणं, फडणवीसांना रुचलं नसल्याचं दिसून येतंय

I do not wash the house on the street, Devendra Fadnavis directly to eknath Khadse | मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, देवेंद्र फडणवीसांचा खडसेंना थेट टोला

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, देवेंद्र फडणवीसांचा खडसेंना थेट टोला

Next
ठळक मुद्देखडसेंच्या सातत्याच्या आरोपावर आणि टोमण्यांवरु देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांच एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. तसेच, खडसेंचं जाहीरपणे पक्षाविरोधात, पक्षातील नेत्यांविरुद्ध बोलणं, फडणवीसांना रुचलं नसल्याचं दिसून येतंय

मुंबई - भाजपामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षावर जोरदार टीका केली होती. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षाच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असे सांगत एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. तसेच मी पक्षाविरोधात बोललेलो नाही. मला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्रास झाला हे मी नाव घेऊन सांगतो, असे म्हणत एकनाथ खडसेंनी थेट फडणवीसांना लक्ष्य केले. त्यानंतर, याबाबत फडणवीसांना विचारलं असता, त्यांनी खडसेंना टोला लगावला. 
 
फडणवीस यांच्याबद्दलचे सबळ पुरावे माझ्याकडे असून मी ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ या पुस्तकात ते पुरावे देणार असल्याचे खडसे यांनी म्हटले.  खडसे म्हणाले, ''माझ्यावर अन्याय झाला आहे. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार. मुखमंत्री तेव्हा अंजली दमानिया यांना वेळ देत भेटत होते. पण खडसें याना भेटत नव्हते. पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. आमचे मुख्यमंत्री  ड्राय क्लिनर होते. कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट मिळायची. मात्र खडसे यांना निर्दोष असतांना क्लिनचिट मिळाली नाही,'' असा टोलाही खडसेंनी लगावला होता.

खडसेंच्या सातत्याच्या आरोपावर आणि टोमण्यांवरु देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांच एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. तसेच, खडसेंचं जाहीरपणे पक्षाविरोधात, पक्षातील नेत्यांविरुद्ध बोलणं, फडणवीसांना रुचलं नसल्याचं दिसून येतंय. कारण, मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, असे फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, माझ्यामध्ये अजूनही संयम आहे, समस्या चर्चा करुन सोडवता येतात. विशेष म्हणजे मनिष भंगाळे प्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागला नसून याप्रकरणी 12 तासांत त्यांना क्लीन चीन मिळाल्याचंही स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलंय. खडसेंना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला असून पक्षश्रेष्ठींना हे सर्व ज्ञात असल्याचेही फडणवीस म्हणाले. 

कंगनापेक्षा कोरोनाकडे लक्ष्य द्यावे

देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आता कोरोनाशी लढणे संपले असून कंगनाशी लढाई सुरु आहे. या प्रकरणात जी काही चौकशी करायची ती करावी. कंगनानेही तसे सांगितले आहे. मात्र कुठंतरी गांभीर्याने कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. याचबरोबर, जेवढ्या तप्तरतेने कंगनाची चौकशी करु, हे करु ते करु म्हणत आहात, त्यापेक्षा जास्त लक्ष कोरोनाकडे द्यायची गरज आहे. त्यापेक्षा 50 टक्के तरी क्षमता कोरोनावर खर्च करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मला व्हिलन केलं

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, मी या पदाच्या शर्यतीतही होतो. मात्र, माझ्यावर आरोप करुन मला बाजुला करण्यात आलं. पंकजा मुंढे या मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हटल्या, त्यांनाही पद्धतशीरपणे हटवलं गेलं. विनोद तावडेंच्या बाबतीतही तेच घडलं, असे म्हणत एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. तसेच, वरिष्ठांकडे माझ्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मला व्हिलन करण्यात आलं. वरिष्ठ पातळीवरील माझेही काही सहकारी मित्र, नेतेमंडळी मला सांगतातच की, आणि हे कुणी केलं सर्वांना माहितीय, असे खडसेंनी म्हटले. 

देवेंद्रजी अजित दादांवर टिका करूच शकत नाहीत

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका करूच शकत नाहीत. कारण त्यांनी आपले सर्व सत्व-तत्व सोडून त्यांच्यासोबत तीन दिवस संसार केला आहे. त्यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. यासाºयात त्यांनी नैतिकता घालविली आहे. त्यामुळे ते अजितदादा यांच्यावर टिका करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्व कटकारस्थानाचे पुरावे मिळाले आहेत. अद्याप तरी हा प्रश्न पक्षा अंतर्गत आहे. याबाबत वरिष्ठांना भेटलो आहे. आता पुरावे ही देणार आहे. कारवाई झाली नाही तर पुढची दिशा ठरवू.
 

Web Title: I do not wash the house on the street, Devendra Fadnavis directly to eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.