ममता बॅनर्जी यांचाही पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 05:53 PM2019-05-25T17:53:05+5:302019-05-25T17:53:33+5:30
हिंदू-मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचे राजकारण झाले. त्यामुळे मतं विभागली गेली.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना खळबळ माजली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत ठेवला, मात्र तो फेटाळला गेला. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा पक्षाच्या बैठकीत ठेवला आहे. मला मुख्यमंत्रीपदी राहण्याची इच्छा नाही असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात केंद्रीय दलाने आमच्याविरोधात काम केलं. पश्चिम बंगालमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली गेली. हिंदू-मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचे राजकारण झाले. त्यामुळे मतं विभागली गेली. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मात्र त्याचं काहीच झालं नाही असं त्यांनी सांगितले.
West Bengal CM Mamata Banerjee: I told at the beginning of the meeting that I don't want to continue as the Chief Minister. pic.twitter.com/KZvH9oyTec
— ANI (@ANI) May 25, 2019
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून जनतेने जाती-पातीच्या राजकारणाला आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्दाला फाटा दिल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भाजपने प्रादेशिक पक्षांची देखील धुळाधान केली. तर अनेक राज्यात अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने १८ जागांवर विजय मिळविला.पश्चिम बंगालमध्ये भाजपने राबविलेल्या 'चूपचाप कमल छाप' मोहिमेची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.
West Bengal CM Mamata Banerjee: The central forces worked against us. An emergency situation was created. Hindu-Muslim division was done and votes were divided. We complained to the EC but nothing was looked into. pic.twitter.com/FSksMoXsBq
— ANI (@ANI) May 25, 2019
काही वर्षांपूर्वी पश्चिम ममता बॅनर्जी यांनी राज्यातून डाव्यांची सत्ता उलथवून टाकत तृणमूल काँग्रेसचा झेंडा फडकविला होता. त्यावेळी डाव्यांना सत्तेतून बाहेर करणे तेवढं सोप नव्हतं. त्यातच पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच नेहमीच हिंसाचार होत असे. अनेकदा आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करणे देखील मतदारांच्या जीवावर बेतत होते. त्यावेळी ममता यांनी डाव्यांविरुद्ध 'चूपचाप फूल छाप' अशी मोहीम राबविली होती. त्यानंतर मतदारांनी चुपचाप पद्धतीने ममता यांना मतदान केले होते.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत 2 जागा जिंकणाऱ्या भाजपाने तब्बल 18 जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले.