मला व्यापमंची भीती वाटते- उमा भारती

By admin | Published: July 7, 2015 12:08 PM2015-07-07T12:08:49+5:302015-07-07T12:44:26+5:30

मध्य प्रदेशमधील 'व्यापमं' घोटाळ्यातील मृत्यूसत्रामुळे केंद्रीय मंत्री उमा भारतीही घाबरल्या असून या रहस्यमय घटनांची आपल्याला भीती वाटते असे त्या म्हणाल्या.

I feel afraid of business- Uma Bharti | मला व्यापमंची भीती वाटते- उमा भारती

मला व्यापमंची भीती वाटते- उमा भारती

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मध्य प्रदेशमधील 'व्यापमं' घोटाळ्यातील या मृत्यूसत्रामुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच या घटनांमुळे केंद्रीय मंत्री उमा भारतीही घाबरल्या आहेत. 'आपण मंत्री असूनही या रहस्यमय घटनांची आपल्याला भीती वाटू लागली आहे' असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
आत्तापर्यत २८ हून अधिक बळी घेणा-या या व्यापमं घोटाळ्याप्रकरणी एका आरोपीने दिलेल्या जबाबानंतर एफआयआरमध्ये उमा भारतींच्या नावाचाही समावेश करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर उमा भारतींनी आपली भीती व्यक्त केली. ' मी एक मंत्री असूनही मला या प्रकरणाची भीती वाटत आहे. रोज होणा-या मृत्युंमुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात माझे नाव आल्याने मला मोठा धक्का बसला आहे. माझं या प्रकरणाशी काहीही घेणदेणं नसतानाही माझे नाव जोडले जात आहे. हे नक्कीच मोठं कारस्थान आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी माझी पूर्वीपासून मागणी आहे' असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याप्रकरणातील मृत्यूसत्र अद्याप कायम असून आज एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्मह्त्या केली आहे. या घोटाळा प्रकरणातील गेल्या चार दिवसातील हा चौथा बळी तरया  प्रकरणातील हा एकूण २९वा बळी आहे. देशभरात या मृत्यूसत्रामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. मध्य प्रदेशमधील तिकमगढ जिल्ह्यातील ओरछा गावातील पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत पांडे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. विशेष पर्यटन पोलीस पथकात कार्यरत असलेल्या पांडे यांची काही दिवसांपूर्वीच व्यापमं गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. 
या प्रकरणात गेल्या चार दिवसात चार जणांचे बळी गेले आहेत. शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा तर रविवारी जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अरूण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील हॉटेलमध्ये सापडला होता. त्या पाठोपाठ  सोमवारी एका प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ मजाली आणि आज एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण मिळाले आहे. 
दरम्यान या घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 
 
 
 
 

Web Title: I feel afraid of business- Uma Bharti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.