"मला अत्यंत दुःख झालं..."; केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात अण्णा हजारे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 01:51 PM2024-03-22T13:51:33+5:302024-03-22T13:52:27+5:30

Anna Hazare reaction over Arvind Kejriwal arrest : राळेगण सिद्धि येथून निवेदन जारी करत हजारे म्हणाले, 'मला अत्यंत दुःख झाले आहे की, अरविंद केजरीवाल सारखा माणूस, जो माझ्यासोबत काम करत होता, आम्ही दारूबंदीसाठी आवाज उचलला होता, तो आज मद्य धोरण बनवत आहे. याचे मला वाईट वाटले.

I felt very sad Anna Hazare spoke clearly about arvind Kejriwal's arrest | "मला अत्यंत दुःख झालं..."; केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात अण्णा हजारे स्पष्टच बोलले

"मला अत्यंत दुःख झालं..."; केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात अण्णा हजारे स्पष्टच बोलले

दिल्लीचे मुख्यंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली. ईडीने गुरुवारी त्यांना अटक केली. यासंदर्भात आता समाज सेवक अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या अटकेला, त्यांच्या कर्माचे फळ म्हटले आहे. एवढेच नाही, तर कधीकाळी केजरीवाल दारू बंदी विरोधातही आपल्या सोबत होते आणि आता ते मद्य धोरण बनवू लागेल आहेत, असे म्हणत अण्णा यांनी दुःखही व्यक्त केले आहे.

राळेगण सिद्धि येथून निवेदन जारी करत हजारे म्हणाले, 'मला अत्यंत दुःख झाले आहे की, अरविंद केजरीवाल सारखा माणूस, जो माझ्यासोबत काम करत होता, आम्ही दारूबंदीसाठी आवाज उचलला होता, तो आज मद्य धोरण बनवत आहे. याचे मला वाईट वाटले. पण करेल काय? सत्ते समोर काही चालत नाही. अखेर त्यांना जी अटक कण्यात आली ती त्यांच्या कृती मुळे झाली. आम्ही हे बोललो नसतो तर अटकेचा प्रश्नच नव्हता. जे झाले आहे, ते कायदेशीर पणे, जे व्हायचे ते होईल. ते सरकार बघेल. विचार करेल.'

कुमार विश्वास यांचा निशाणा -
केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर, कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X)वर "कर्म प्रधान विश्व रचि राखा। जो जस करहि सो तस फल चाखा॥" या गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. या चौपाईच्या माध्यममाने गोस्वामी तुलसीदास कर्माचे महत्व विशद करतात. "हे विश्व कर्म प्रधान आहे, जी व्यक्ती जसे करते, तिला तसे फळ मिळते." असा या चौपाईचा अर्थ आहे. या ओळींच्या माध्यमाने कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल हे अन्ना आंदोलनातील सहकारीही होते.

केजरीवाल कसे अडकले? -

मनीष सिसोदिया यांच्या जामिनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, या प्रकरणी आपण संपूर्ण पक्ष अथवा पक्षाच्या प्रमुखांनाही समन पाठवणार का? असा प्रश्न न्ययालयाने ईडीला विचारला होता. यावर, विचार करू, असे सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले होते. यानंतर, ईडीने अरविंद केजरीवाल यांना पहिले समन पाठवले होते. दिल्ली अबकारी नीती प्रकरणाशी अरविंद केजरीवाल यांचा संबंध होता, असा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या मते, मद्य नीती लागू करण्यात कथित भ्रष्टाचार झाला आहे. जो 338 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. 
 

Web Title: I felt very sad Anna Hazare spoke clearly about arvind Kejriwal's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.