'मी 20 वर्षांपासून अपमान सहन करतोय', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर PM मोदी दुःखी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 07:54 PM2023-12-20T19:54:37+5:302023-12-20T19:55:25+5:30

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे.

'I have been suffering humiliation for 20 years', PM Modi sad over Jagdeep Dhankhad mimicry case | 'मी 20 वर्षांपासून अपमान सहन करतोय', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर PM मोदी दुःखी

'मी 20 वर्षांपासून अपमान सहन करतोय', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर PM मोदी दुःखी

Loksabha MP Suspension Mimicry of Dhankhar ( Marathi News ): तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याशी फोनवर चर्चा केली असून, या कृत्यावर दुःख व्यक्त केले. स्वतः धनखड यांनी ही माहिती दिली आहे.

संबंधित बातमी- 'मी व्हिडिओ शूट केला, पण...', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

जगदीप धनखड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. काही खासदारांनी काल पवित्र संसदेच्या आवारात केलेल्या मिमिक्रीच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. पंतप्रधानांनी मला सांगितले की, गेल्या वीस वर्षांपासून तेदेखील असाच अपमान सहन करत आहेत. पण, भारताच्या उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक पदाशी आणि तेही पवित्र संसदेत असे वागणे दुर्दैवी आहे." 

"मी पंतप्रधानांना सांगितले की, काही लोकांच्या मूर्खपणाच्या कृती मला माझे कर्तव्य बजावण्यापासून आणि आपल्या संविधानात दिलेल्या तत्त्वांचा आदर करण्यापासून रोखू शकत नाहीत. मी संवैधानिक मूल्यांसाठी वचनबद्ध आहे आणि असे अपमान मला माझ्या मार्गावरुन हटवू शकत नाहीत."

राष्ट्रपतींची प्रतिक्रिया
याप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, "संसदेच्या संकुलात आदरणीय उपराष्ट्रपतींचा ज्या प्रकारे अपमान झाला, ते पाहून मी निराश झाले आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधींना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांची अभिव्यक्ती प्रतिष्ठा आणि शिष्टाचाराच्या निकषांमध्ये असली पाहिजे. या संसदीय परंपरेचा आपल्याला अभिमान आहे आणि हा कायम राखला जावा, अशी लोकांची अपेक्षा आहे." 

'उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही'
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी संसदेत बोलताना म्हणाले की, "मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. हे लोक घटनात्मक पदावर असलेल्या लोकांचा अपमान करतात. आधी पंतप्रधानांचा अपमान करायचे, कारण ते गरीब पार्श्वभूमीतून आलेले आहेत. तुमचाही अपमान केला, कारण तुम्ही शेतकरी पार्श्वभूमीचे आहात. भारत देश उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही. "

संबंधित बातमी- राहुल गांधी बेजबाबदार, TMC खासदाराने माफी मागावी; जाट समाजाचे जगदीप धनखड यांना समर्थन

Web Title: 'I have been suffering humiliation for 20 years', PM Modi sad over Jagdeep Dhankhad mimicry case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.