'मला अनेक देशांकडून सप्टेंबरपर्यंतची निमंत्रणं, त्यांनाही माहीत आहे...'; PM मोदी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 05:58 PM2024-02-18T17:58:02+5:302024-02-18T17:58:29+5:30
भाजपच्या या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखा जोखाच मांडला नाही, तर तिसऱ्या टर्मसाठी शड्डूही ठोकला आहे.
लोकसभानिवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रदान नरेद्र मोदी यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच निवडणुकीच्या आखाड्यात उतण्यापूरर्वी कार्यकर्त्यांना गुरुमंत्रही दिला. भाजपच्या या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखा जोखाच मांडला नाही, तर तिसऱ्या टर्मसाठी शड्डूही ठोकला आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसला अस्थिरतेची जननी म्हणत, आपल्याला सप्टेंबरपर्यंत विविध देशांकडून निमंत्रणे आली आहेत, त्यांनाही माहीत आहे की, येणार तर मोदीच.
काँग्रेसवर निशामणा साधत मोदी म्हणाले, गेल्या 5 वर्षांपूर्वी त्यांनी भारताला राफेल मिळू नये म्हणून प्रयत्न केले. HAL ला नष्ट केले जात आहे, अशी चुकीची माहिती पसरवली. आज HAL चे बाजारमूल्य किती वाढले आहे, ते बघा. हे तेच लोक आहेत ज्यांनी एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले होते. काँग्रेस किती गोंधळात आहे, याचे उदाहरण म्हणजे, काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आहे. विशेष म्हणजे, ही सिद्धांताची लढाई नाही.
'काँग्रेसमध्ये सैद्धांतिक विरोध' -
राष्ट्रीय अधिवेशनात मोदी म्हणाले, 'काँग्रेसमध्ये एक गट असा आहे, जो म्हणतो, मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच वापरा आणि एक वर्ग असा आहे, जो म्हणतो, मोदींवर वैयक्तिक टीका करू नका. काँग्रेसमध्ये सैद्धांतिक विरोध करण्याचे धाडसही उरलेले नाही, यामुळे ती केवळ मोदींना विरोध करण्यापूरतीच उरली आहे. "यही समय है, सही समय है", असे मी लाल किल्यावरून म्हटले होते. देशाचे भविष्य बदलण्याची वेळ आली आहे.
पीएम मोदी पुढे म्हणाले, परराष्ट्र विषयक धोरणाच्या जाणकारांना परदेशातून मिळणारे संकेत समजत आहेत. भारत मजबूत झाल्यास, सर्वांनाच फायदा होईल, असा विश्वास इतर देशांतील सत्ताधारी आणि विरोधकांना आहे. सर्व देश आपल्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करत आहेत. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की, माझ्याकडे सप्टेंबर महिन्यांतील निमंत्रणेही येऊन पडलेली आहेत आणि जगातील सर्व देशांना माहीत आहे की, येणार तर मोदीच."