व्हिसा भेटीसाठी (अपॉइंटमेंट) मला सकाळी 10 वाजताची वेळ मिळाली आहे, किती वाजता उपस्थित राहावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 10:17 AM2018-01-29T10:17:00+5:302018-01-29T10:17:33+5:30

व्हिसा अपॉइंटमेंटसाठी मिळालेल्य़ा वेळीच अमेरिकन काऊन्सलेट जनरल कार्यालयात उपस्थित राहाता येईल

I have my visa appointment in Mumbai next week at 10am. What time should I arrive for my visa appointment? | व्हिसा भेटीसाठी (अपॉइंटमेंट) मला सकाळी 10 वाजताची वेळ मिळाली आहे, किती वाजता उपस्थित राहावे?

व्हिसा भेटीसाठी (अपॉइंटमेंट) मला सकाळी 10 वाजताची वेळ मिळाली आहे, किती वाजता उपस्थित राहावे?

Next

प्रश्न- पुढील आठवड्यात व्हिसा मुलाखतीसाठी मला सकाळी 10 वाजताची वेळ मिळाली आहे, मी व्हिसा भेटीसाठी (अपॉइंटमेंट) किती वाजता उपस्थित राहावे?

उत्तर-  व्हिसा अपॉइंटमेंटसाठी मिळालेल्य़ा वेळीच अमेरिकन काऊन्सलेट जनरल कार्यालयात उपस्थित राहाता येईल. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करावे. जर तुमची वेळ सकाळी 10 वाजताची आहे, तर तुम्ही बरोबर 10 वाजताच येणे अपेक्षित आहे. तुम्ही वेळेच्या आधी आलात तरीही तुम्हाला नियोजित वेळेआधी अपॉइंटमेंट मिळणार नाही. 

नियोजित वेळीच आमचे स्वागतक तुमची कार्यालयात भेट घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करतील. जर तुम्ही नियोजित वेळेआधी आलात तर तुम्हाला वाणिज्यदुतावासाबाहेर तुमची वेळ येईपर्यंत थांबावे लागेल. जर तुम्ही उशिरा आलात तर मोकळा वेळ उपलब्ध असेल, तर आपल्याला संधी देण्यात येईल. अन्यथा आपल्याला नवी वेळ घ्यावी लागेल.

तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता वाणिज्यदुतावासाजवळ असलेल्या रस्त्यांवर वाट पाहात बसू नका. जर आपण वेळे आधी आलात तर अमेरिकन वाणिज्यदुतावासाच्या परिसरामध्ये असणाऱ्या उपहारगृह, हॉटेलला भेट द्यावी असे आम्ही सुचवतो.
 

Web Title: I have my visa appointment in Mumbai next week at 10am. What time should I arrive for my visa appointment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.