मी कधीच हेल्मेटशिवाय खेळलो नाही, तुम्हीपण हेल्मेट वापरा - सचिन
By admin | Published: February 8, 2016 12:03 PM2016-02-08T12:03:58+5:302016-02-08T12:21:59+5:30
स्वत:चा जीव जपण्यासाठी दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं आवश्यक आहे' असा सल्ला सचिन तेंडुलकरने नागरिकांना दिला
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - राज्यभरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात आल्यामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरलेली असून या मुद्यावरूनही राजकारण सुरू आहे. मात्र ' स्वत:चा जीव जपण्यासाठी दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं आवश्यक आहे' असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नागरिकांना दिला. ' मीही कधी हेल्मेटशिवाय बॅटिंग केली नाही, मी अंपायरकडे हेल्मेट देऊन खेळलो असतो तर चाललं असतं का' असा सवाल विचारत त्याने सचिनने नागरिकांना वाहतुकीचे निमय पाळण्यास सांगितले. दिल्लीतील ऑटो एक्स्प्रेसमध्ये तो बोलत होता.
' वाहतुकीचे नियम पाळणं खूपं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी ब-याचवेळा सिग्नलवर थांबलेला असतो पण तेव्हा माझ्या बाजूने भरधाव वेगात गाड्या जात असतात. त्यावेळेस मला भीती वाटते. जगात असं कुठेही होत नाही, सगळीकडेच नियम पाळले जातात. पण आपल्याकडे मात्र तसं होताना दिसत नाही' असं सचिनने नमूद केले. ‘आपण ट्रॅफिकची शिस्त पाळली पाहिजे, सीटबेल्ट लावणंही तितकच गरजेचं आहे. आणि दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणं महत्वाचे आहे. अनेक बाइकस्वार हेल्मेट घालत नाही, साईड मीररला हेल्मेट लटकवूनच ते बाइक चालवत असतात. बॅटिंग करताना मी कधीच माझे हेल्मेट अंपायरच्या हातात दिलं नाही, तसं केलं असतं तर चाललं असतं का? असा सवाल विचारत त्याने सर्वांनीच हेल्मेट वापरलं पाहिजे याचा पुनरुच्चार केला.