'मुस्लीम महिलांनी...! मी इस्लाम नाही, ओवेसींच्या विरोधात...'; प्रभू रामचंद्रांचा उल्लेख करत माधवी लता स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 16:50 IST2024-04-13T16:49:53+5:302024-04-13T16:50:56+5:30
आज (शनिवारी) त्या आपल्या मतदार संघातील विविध भागांत प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी ओवेसींच्या आरोपांवरही पलटवार केला...

'मुस्लीम महिलांनी...! मी इस्लाम नाही, ओवेसींच्या विरोधात...'; प्रभू रामचंद्रांचा उल्लेख करत माधवी लता स्पष्टच बोलल्या
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या जबरदस्त तापताना दिसत आहे. येथे एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढत असलेल्या भाजप उमेदवार माधवी लता ओवेसींवर सातत्याने निशाना साधताना दिसत आहेत. आज (शनिवारी) त्या आपल्या मतदार संघातील विविध भागांत प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी ओवेसींच्या आरोपांवरही पलटवार केला.
'मी इस्लाम विरोधात कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही' -
माधवी लता म्हणाल्या, मी इस्लाम विरोधात कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. मी नेहमीच असदुद्दीन ओवेसीं विरोधात प्रश्न उपस्थित केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना माधवी लता यांनी असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या भावाने प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांचीही आठवण करून दिली.
माधवी लता म्हणाल्या, "असदुद्दीन ओवेसी विसरले आहेत की, त्यांनी आणि त्यांच्या भावाने रामचंद्र, त्यांची माता आणि माता सीता यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आमच्या देवांच्या बाबतीत का बोलाल?" आता, देवतांबद्दल केलेले भाष्य ऐकूण आम्ही गप्प बसू, ते दिवस संपले आहेत. आता आम्ही गप्प बसणार नाही.
काय म्हणाल्या होत्या माधवी लता? -
हैदराबादमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान, "मुस्लीम महिलांनी बुरखा घालू नये, तिहेरी तलाकच्या विरोधात उभे रहायला हवे आणि बहुपत्नीत्वाला विरोध करायला हवा, असे माधवी लता यांनी म्हटले होते. यावर, त्या इस्लाम विरोधात बोलत आहे, असा आरोप ओवेसी यांनी केला होता. यानंतर, मी मुस्लीम महिलांना सशक्त बनण्याचा सल्ला दिला आहे. असे म्हणत, मुस्लीम पुरुषांनी एकापेक्षा अधिक लग्न करावेत, असे ओवेसींना का वाटते? असा सवालही माधवी लता यांनी केला.
खरे तर, जुन्या हैदराबादमध्ये दीर्घकाळ समाज कार्यात असलेल्या सामाजिक कार्यकर्ता माधवी लता, या असदुद्दीन ओवेसींसाठी एका मोठ्या आव्हानाच्या रुपात समोर येत आहेत. हैदराबादमधून आपन निवडणूक जिंकणार आणि ओवेसींचा पराभव होणार, असा दावा त्या करत आहेत.