‘तुमचेही व्हिडिओ माझ्याकडे आहेत, व्हायरल करेन’, आवाज उठवणाऱ्या तरुणींना धमकीचे मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 04:11 PM2022-09-20T16:11:15+5:302022-09-20T16:11:27+5:30
चंदीगड विद्यापीठातील MMS प्रकरणात तरुणींना धमकीचे मेसेज येत आहेत.
चंदीगड: चंदीगड विद्यापीठत झालेले MMS कांडाने जोर पकडला आहे. विद्यापीठातील तरुण न्यायासाठी सातत्याने आवाज उठवत असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहेत. मात्र, न्यायासाठी लढणाऱ्या मुलींनाही धमकीचे मेसेज मिळू लागले आहेत, ज्यात त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
नेमंक प्रकरण काय ?
विद्यापीठातील एका आरोपी विद्यार्थिनीने विद्यापीठातील अनेक मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून तिच्या बॉयफ्रेंडला पाठवले. तिच्या बॉयफ्रेंडने हे व्हिडिओ पॉर्न साइट्सवर व्हायरल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
'तुमचा व्हिडिओ माझ्याकडे आहे'
आवाज उठवणाऱ्या तरुणींचा आवाज दाबण्यासाठी त्यांना धमक्या दिल्याचा प्रकार घडत आहे. आरोपीच्या साथीदाराने धमकी दिली की, 'माझ्या मित्राला (आरोपी) दोन दिवसांत तुरुंगातून बाहेर काढा, नाहीतर तुमचे व्हिडिओ व्हायरल करेन.' धमकी देणाऱ्याने मेसेज टिलीट केले, पण त्यापूर्वीच विद्यार्थिनीने स्क्रिनशॉट घेतले. आरोपीच्या मित्राने इन्स्टाग्रामवरून हे धमकीचे संदेश पाठवले आहेत. आता पोलिसांनी या इन्स्टाग्राम अकाऊंटची चौकशी सुरू केली आहे.
वॉर्डनचा व्हिडिओ व्हायरल
चंदीगड विद्यापीठाच्या आणखी एका वॉर्डनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती मुलींना धमकावून घरी जाण्यास सांगत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. विद्यापीठात जे काही घडलं, त्याला वॉर्डन विद्यार्थ्यांवरच दोष देत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. यापूर्वी विद्यापीठाने दोन वॉर्डनना निष्काळजीपणाबद्दल निलंबित केले होते.