विकासाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच भाजपाचा पराभव, संजय काकडेंचा घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:21 PM2018-12-11T14:21:09+5:302018-12-11T14:25:48+5:30
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या भाजपाच्या पिछेहाटीनंतर भाजपामधूनच पक्षाच्या धोरणांविरोधात आवाज उठू लागला आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या भाजपाच्या पिछेहाटीनंतर भाजपामधूनच पक्षाच्या धोरणांविरोधात आवाज उठू लागला आहे. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपा पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोलेल्या भाजापाला राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी घरचा अहेर दिला आहे. विकासाचा मुद्दा विसरून राम मंदिर, पुतळे आणि नामांतराच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यानेच भाजपाला पराभव पत्करावा लागल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या कलांबाबत प्रतिक्रिया देताना भाजपाचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे म्हणाले की, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव होईल, हे माहीत होते. मात्र मध्य प्रदेशमधील निकाल धक्कादायक आहे. आमच्या पक्षाने विकासाचा मुद्दा विसरून राम मंदिर, पुतळे आणि नामांतराच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यानेच भाजपाला पराभव पत्करावा लागला,''
Sanjay Kakade, BJP Rajya Sabha MP: I knew we would lose in Rajasthan & Chhattisgarh but MP trends have come as a surprise. I think we forgot the issue of development that Modi took up in 2014. Ram Mandir, statues & name changing became the focus. #AssemblyElectionResults2018pic.twitter.com/pHXe4PwhPr
— ANI (@ANI) December 11, 2018