"प्रेम नव्हते, माझ्याकडून चूक झाली"; अमेठी हत्याकांडातील आरोपीला गोळीबारानंतर पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 12:47 PM2024-10-05T12:47:38+5:302024-10-05T12:49:27+5:30

उत्तर प्रदेशात चौघांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे.

I made mistake Amethi murder case accused Chandan Verma now regrets it | "प्रेम नव्हते, माझ्याकडून चूक झाली"; अमेठी हत्याकांडातील आरोपीला गोळीबारानंतर पश्चाताप

"प्रेम नव्हते, माझ्याकडून चूक झाली"; अमेठी हत्याकांडातील आरोपीला गोळीबारानंतर पश्चाताप

Amethi Crime : उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात शाळेतील शिक्षक आणि त्याच्या कुटुंबीयांच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिस चकमकीत या प्रकरणातील मुख्य आरोपी चंदन वर्मा जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक केल्यानंतर आरोपी चंदन शर्मा पोलीस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पायात गोळी झाडली. आरोपी चंदन वर्मा याला पोलिस चकमकीनंतर उपचारासाठी नेले जात असताना त्याने शिक्षिकेच्या पत्नीसोबत प्रेम नसल्याचे सांगितले.

अमेठीतील शिक्षकाच्या कुटुंबाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.हत्येचा आरोपी चंदन वर्मा आणि शिक्षकाची मयत पत्नी  पूनम यांच्यात संबंध असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. गुरुवारी आरोपी चंदनने शिक्षक सुनीलच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळी झाडली. त्यात सुनील, त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी खून करून फरार झालेल्या चंदनला शुक्रवारी सकाळी अटक केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. चंदनने आधीच खुनाचा कट रचला होता. पोलिसांसोबत जात असताना आरोपीने पिस्तुल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी चंदन शर्मा जखमी झाला.

पोलिस चकमकीनंतर जखमी झालेल्या चंदन शर्माला एक्स-रेसाठी जात असताना मोठा खुलासा केला आहे. माझं पूनमसोबत प्रेम नव्हतं. जे झालं त्याचा मला खेदा आहे, असं चंदन शर्माने म्हटलं आहे. मुलांच्या हत्येबाबत विचारले असता त्याने चूक झाल्याचे सांगितले. पोलीस चकमकीत जखमी झाल्याने चंदन वर्माला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वॉर्डाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

आरोपी चंदन वर्माला शुक्रवारी रात्री नोएडा येथील टोल प्लाझाजवळ अटक करण्यात आली. अमेठीतील अहोर्वा भवानी परिसरात सरकारी शाळेतील शिक्षक सुनील कुमार (३५), पत्नी पूनम (३२) आणि त्यांच्या दोन मुली दृष्टी (६) आणि सुनी (एक वर्ष) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूनमने आरोपी वर्मावर छळ केल्याचा आरोप केला होता आणि त्यांच्याविरोधात पोलिस तक्रारही केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर चंदन वर्मा तुरुंगात गेला आणि जात असताना त्याने जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तक्रार मागे घेण्यासाठी चंदनने सुनीलच्या कुटुंबीयांवर अनेकदा दबावही आणला होता. मात्र सुनीलचे कुटुंबीय तयार नव्हते.

दरम्यान, हत्येपूर्वी चंदन वर्मा हा दीपक सोनी याच्या मोबाईल शॉपीमध्ये गेला होता आणि तेथे त्याची बुलेट बाईक उभी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यानंतर तो तात्काळ शिक्षक सुनील कुमार यांच्या घरी गेला. तेथून निघताच त्याने चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन वर्माने हत्येपूर्वी संपूर्ण योजना आधीच तयार केली होती. पोलिसांनी चंदन वर्माची बहीण आणि भावजयांसह अन्य चार जणांनाही ताब्यात घेतले आहे.

Web Title: I made mistake Amethi murder case accused Chandan Verma now regrets it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.