'मला गॅगस्टर किंवा दहशतवादी म्हणू नये...', लॉरेन्स बिश्नोईने विशेष न्यायालयात अर्ज केला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 04:28 PM2023-09-22T16:28:16+5:302023-09-22T16:29:42+5:30

लॉरेन्स बिश्नोईच्या वकिलांनी अहमदाबाद, गुजरातच्या विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

'I should not be called a gangster or a terrorist Lawrence Bishnoi filed an application in the special court | 'मला गॅगस्टर किंवा दहशतवादी म्हणू नये...', लॉरेन्स बिश्नोईने विशेष न्यायालयात अर्ज केला दाखल

'मला गॅगस्टर किंवा दहशतवादी म्हणू नये...', लॉरेन्स बिश्नोईने विशेष न्यायालयात अर्ज केला दाखल

googlenewsNext

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने अहमदाबादच्या विशेष न्यायालयात आपल्याला गॅगस्टर आणि दहशतवादी म्हणू नये, असा अर्ज केला आहे. त्याच्यावर अद्याप एकही गुन्हा सिद्ध झालेला नसून तो विद्यार्थी संघटनेच्या काळापासून तुरुंगात आहे, त्यामुळे त्याला गुंड किंवा दहशतवादी म्हणणे चुकीचे ठरेल, असे अर्जात म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी सरकार किंवा पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

LUX कंपनीवर आयकरच्या धाडी! मालकाच्या घरावर आणि ऑफिसवरही सकाळी ६ वाजता छापा

सरकारी वकिलांनी २५ सप्टेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. कॅनडातील गँगस्टर सुखदुल सिंग उर्फ ​​सुखा दुनाकेच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईने फेसबुक अकाऊंटवरुन घेतल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. लॉरेन्स बिश्नोईचे वकील आनंद ब्रह्मभट्ट म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोईच्या नावावर १५० हून अधिक फेसबुक अकाउंट आहेत.

वकील म्हणाले की, आता ८०० रुपयांत खाते व्हेरीफाय  केले जाऊ शकते, तुरुंगात असलेला माणूस एखाद्याचा खून कसा करू शकतो. हे सर्व दावे खोटे असून लॉरेन्सला तुरुंगात अन्य काही सुविधा दिल्या जात असतील तर त्याबाबत पोलीस प्रशासनाने अधिकृत निवेदन द्यावे. हे खरे असेल तर अशा अधिकाऱ्याला निलंबित केले पाहिजे.

भारतातून फरार झालेला गँगस्टर सुखदुल सिंह उर्फ ​​सुखा याची कॅनडात हत्या करण्यात आली होती. ही गोळीबार विनिपेग शहरात झाली. अज्ञात हल्लेखोरांनी सुखाच्या घरात घुसून त्याच्या डोक्यात नऊ गोळ्या झाडल्या. या प्रकरणानंतर, कॅनडापासून १०,५७० किलोमीटर अंतरावर असलेल्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने या हत्येची जबाबदारी घेतली असल्याचे सांगण्यात आले. 

लॉरेन्स गँगने पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या केली होती. या दोन हत्येमागे बिष्णोई टोळी आणि बंबीहा टोळी यांच्यातील रक्तरंजित युद्ध असल्याचे सांगितले जात आहे.

सुखाच्या मृत्यूची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने तयार केलेल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून स्वीकारण्यात आली होती. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'होय सर, बंबिहा ग्रुपचा प्रभारी असलेल्या या सुखा दुनिकेची कॅनडामध्ये हत्या करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई ग्रुप त्याची जबाबदारी घेतो. 

Web Title: 'I should not be called a gangster or a terrorist Lawrence Bishnoi filed an application in the special court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.