I support Uddhav Thakeray: उद्धव ठाकरेंना भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याचा उघडपणे पाठिंबा; निवडणूक आयुक्तांच्या निकालावर केले भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:23 IST2023-02-21T15:22:44+5:302023-02-21T15:23:58+5:30
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हा शिंदे गटाला देऊन टाकल्याने उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली होती.

I support Uddhav Thakeray: उद्धव ठाकरेंना भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याचा उघडपणे पाठिंबा; निवडणूक आयुक्तांच्या निकालावर केले भाष्य
एवढी सगळी कागदपत्रे मागवूनही ऱाष्ट्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हा शिंदे गटाला देऊन टाकल्याने उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली होती. याला भाजपाच्या राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेत्याने पाठिंबा दिला आहे.
'निवडणूक आयोगाने आम्हाला जी कागदपत्र सांगितली ती आम्ही त्यांना दिली. त्यांनी सदस्य संख्या सांगितली ती सर्व दिली. पहिल्यांदा एक निकष लावला, पुन्हा सदस्य संख्येचा निकष लावला. तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला प्रतिज्ञा पत्र का द्यायला लावली, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला होता.
'आम्ही कार्यकारणीची झालेल्या सभेची सीडी दिली. यात आयोग म्हटले कव्हरींग लेटर दिलेलं नाही. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही, निवडणुकी पद्धतीने आयोग नेमला पाहिजे. आताच निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
I support Uddhav Thakre demand to sack the CEC since his tenure earlier in Finance Ministry was dubious
— Subramanian Swamy (@Swamy39) February 21, 2023
याला भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. निवडणूक आयुक्तांचा वित्त मंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद होता, यामुळे माझा उद्धव ठाकरेंच्या निवडणूक आयोग बरखास्तीच्या मागणीला पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.