'मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही'; मलिकांचा करारी बाणा, राऊतांची दाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 11:26 PM2023-04-21T23:26:31+5:302023-04-21T23:27:42+5:30

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन मोठ्या प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता.

'I, the farmer's son, will not be afraid'; Satyapal Malik's deal after CBI notice, Sanjay raut also tweet | 'मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही'; मलिकांचा करारी बाणा, राऊतांची दाद

'मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही'; मलिकांचा करारी बाणा, राऊतांची दाद

googlenewsNext

श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पुन्हा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने तोंडी समन्स पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलिक यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी एजन्सीने हजर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सीबीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र, मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही, असा करारी बाणाही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, गंभीर आरोपही केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन मोठ्या प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने सत्यपाल मलिक यांना समन्स बजावले आहे. दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा मलिक यांनी केला होता. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्यांची चौकशी केली होती. आता, पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सत्यपाल मलिक यांनी ८ दिवसांपूर्वी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. तसेच, पुलवामा हल्ल्यासंदर्भातही गौप्यस्फोट केला होता.

दरम्यान, सीबीआयच्या समन्सनंतर सत्यपाल मलिक यांनी ट्विटरवरुन आपली भूमिका व्यक्त केली आहे. मी सत्य बोलून काही जणांचे पाप उघडे केले आहेत, कदाचित त्यामुळेच मला बोलावणं आलं आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, घाबरणार नाही, सत्यासोबतच राहणार, असे मलिक यांनी म्हटलंय. मलिक यांचे हे ट्विट रिट्विट करत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जय हिंद म्हटलं आहे. तसेच, जो डर गया, वो मर गया... असेही राऊत यांनी म्हटलं आहे. 

'पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार' : सत्यपाल मलिक

काही दिवसांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी यांनी मोठा दावा केला होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरने थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल 40 CRPF जवान शहीद झाले होते. ही घटना सरकारच्या चुकीमुळे झाल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी त्यावेळी मला गप्प राहायला सांगितले, असेही ते म्हणाले. त्यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 
 

Web Title: 'I, the farmer's son, will not be afraid'; Satyapal Malik's deal after CBI notice, Sanjay raut also tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.