'कलम 35 अ'मध्ये बदल करु देणार नाही, यासाठी मरेपर्यंत लढेन - फारुख अब्दुल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 09:33 PM2018-08-11T21:33:43+5:302018-08-11T21:38:31+5:30
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 'कलम 35 अ' मुद्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 'कलम 35 अ' मुद्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकार 'कलम 35 अ'मध्ये बदल करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाने सांगितले आहे. तसेच, मी 'कलम 35 अ' मध्ये बदल करु देणार नाही, यासाठी मरेपर्यंत लढेन, असे आव्हान फारुख अब्दुल्ला यांनी दिले आहे. केंद्रातील मोदी सरकार 'कलम 35 अ'वरून राजकारण करत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे.
We won't allow any changes in article 35A, They only want to strangle us in problems. They can't change it, the constitutional bench has already told this 2 times, till I don't go down in my grave I will fight against them: Former #JammuAndKashmir Chief Minister Farooq Abdullah pic.twitter.com/M1bvy4kiTm
— ANI (@ANI) August 11, 2018
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 'कलम 35 अ' च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑगस्ट रोजी स्थगित ठेवली होती. यावर आता 24 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.