'बहुत याद आयेंगे, जरा भूल के तो देखो', लालूंचाही शायरीतून निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 03:45 PM2019-12-03T15:45:24+5:302019-12-03T15:46:14+5:30
राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना रेल्वे विभागात महत्वपूर्ण काम केलं होतं
पटणा - राजकारणात सध्या शेरो-शायरीचा ट्रेंड चांगलाच सेट होताना दिसतोय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शायरीच्या माध्यमातून भाजपावर वार केले. तर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही सत्ताधाऱ्यांना शायरीतूनच इशारा दिला. त्यानंतर, आता माजी रेल्वेमंत्रीलालूप्रसाद यादव यांनीही शायरीच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना रेल्वे विभागात महत्वपूर्ण काम केलं होतं. त्यांच्या या कामाचं आजही कौतुकाने स्मरण केलं जातंय. मात्र, सध्याच्या रेल्वे विभागातील परिस्थीतसंदर्भातील एका बातमीला अनुसरुन लालूंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. लालू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही बातमी ट्विट केली आहे. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे नफ्यात होती. या आशयाची ही बातमी ट्विट करताना, लालूंचा शायराना अंदाज पाहायला मिळाला.
किसीने मुझे याद किया क्या, बहुत हिचकी आ रही है
मोहब्बत हमारी भी बहुत असर रखती है
बहुत याद आयेंगे, जरा भूल के तो देखो..
मुझे अभी किसी ने याद किया क्या?
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) December 3, 2019
बहुत हिचकी आ रही है..
मोहब्बत हमारी भी, बहुत असर रखती है,
बहुत याद आयेंगे, जरा भूल के तो देखो...https://t.co/EDuZTSej5M
अशी शायरी लालूप्रसाद यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. दरम्यान, कॅगच्या अहवालानुसार भारतीय रेल्वेचं उत्पन्न गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी उत्पन्न असल्याचं समोर आलंय. रेल्वे विभागाचे उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च 2017-18 मध्ये 98.44 टक्क्यांपर्यंत पोहोचल आहे. लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगात आहेत. सध्या त्यांच्या लहान मुलाकडे म्हणजे तेजस्वी यादव यांच्याकडे त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे.