..तर, मी अरविंद सुब्रमण्यम यांना हटवण्याची मागणी नाही करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2016 12:40 PM2016-06-23T12:40:40+5:302016-06-23T12:41:33+5:30

अरविंद सुब्रमण्यम यांचा सरकार देशभक्त म्हणून विचार करत असेल तर, त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी मी सोडून देईन.

..that, I will not ask for the removal of Arvind Subramanyam | ..तर, मी अरविंद सुब्रमण्यम यांना हटवण्याची मागणी नाही करणार

..तर, मी अरविंद सुब्रमण्यम यांना हटवण्याची मागणी नाही करणार

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २३ - अरविंद सुब्रमण्यम यांचा सरकार देशभक्त म्हणून विचार करत असेल तर, त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी मी सोडून देईन असे खासदार आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामींनी अरविंद सुब्रमण्यम यांना मुख्य आर्थिक सल्लागारपदावरुन हटवण्याची मागणी केल्यानंतर सरकारने अरविंद सुब्रण्यम यांचे जोरदार समर्थन केले आहे. 
 
त्यावर स्वामींनी आज पुन्हा टि्वट केले आहे. मुख्य आर्थिक सल्लागारपदावर नियुक्ती होण्यापूर्वी अरविंद सुब्रमण्यम यांनी २०१३ मध्ये औषधनिर्माण नियमातंर्गत अमेरिकेला भारतावर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता असा आरोप स्वामींनी केला आहे. 
 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वामींची मागणी फेटाळून लावताना सरकारला मुख्य आर्थिक सल्लागारांवर पूर्ण विश्वास असून, वेळोवेळी त्यांच्याकडून मिळणारे सल्ले मौल्यवान आहेत असे म्हटले आहे. 
 

Web Title: ..that, I will not ask for the removal of Arvind Subramanyam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.