मी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही - शिवपाल यादव
By admin | Published: February 22, 2017 06:17 PM2017-02-22T18:17:37+5:302017-02-22T18:32:47+5:30
कॉंग्रेस ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. त्याठिकाणी मी प्रचार करणार नाही असे, अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी स्पष्ट केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसने आघाडी केलीआहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी एकमेकांच्या प्रचारसभेत भाग घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कॉंग्रेस ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. त्याठिकाणी मी प्रचार करणार नाही असे, अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी स्पष्ट केले आहे.
मी समाजवादी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविली आहे. त्यामुळे मी अद्याप याच पार्टीत आहे. मात्र 11 मार्चनंतर म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझा अपमान होणार नसेल, तर मी समाजवादी पार्टीसोबत असणार आहे, असे शिवपाल यादव यांनी सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्याठिकाणी प्रचाराला जाणार नाही. परंतू नेताजींनी (मुलायम सिंह यादव) सांगितले तर जाईन. मात्र, विशेष करुन समाजवादी पार्टीच्या प्रचाराला जाणार, असेही शिवपाल यादव म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यातील पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला होता.