जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 12:50 PM2019-02-27T12:50:44+5:302019-02-27T12:51:22+5:30

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची घटना मंगळवारी घडली.

IAF Fighter Jet Crashes in Jammu And Kashmir's Budgam | जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान कोसळले

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान कोसळले

Next

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची घटना मंगळवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील कलान गावात लढाऊ विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच ऑपरेशन टीम घटनास्थळी दाखल झाली असून अपघातग्रस्त विमानातून दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. दरम्यान, याबाबत अद्याप अधिक माहिती मिळाली नाही. 



 

दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 



 


Web Title: IAF Fighter Jet Crashes in Jammu And Kashmir's Budgam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.