IAF Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 04:23 PM2021-12-08T16:23:39+5:302021-12-08T16:30:00+5:30

IAF Helicopter Crash : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे १४ अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. आतापर्यंत ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे खूपच जळाले आहेत.

IAF Helicopter Crash: CDS General Bipin Rawat's condition is critical | IAF Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर

IAF Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर

Next

भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. १४ जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे एमआय-१७व्ही५  हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण १४ जण हेलिकॉप्टरमध्ये होते. जनरल बिपिन रावत हे गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात बुधवारी दुपारी १२.२० वाजता लष्कराचे एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे १४ अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. आतापर्यंत ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे खूपच जळाले आहेत.

अपघातानंतर सुमारे तासाभरात जनरल बिपीन रावत यांना वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. जनरल बिपिन रावत गंभीर जखमी झाल्याचा दावा काही अहवालात केला जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जनरल रावत यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दिल्लीत त्यांच्या घरी पोहोचले. जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. त्यांनी १ जानेवारी २०२० रोजी हे पद स्वीकारले. रावत यांनी ३१ डिसेंबर २०१६  ते ३१ डिसेंबर २०१९ या काळात लष्करप्रमुखपद भूषवले होते.

निवृत्त लेफ्टनंट जनरल एचएस पनाग यांनी श्रद्धांजली वाहिली

जनरल बिपिन रावत यांच्याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही, परंतु लष्कराच्या सूत्रांनी आणि काही माजी अधिकाऱ्यांनी जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल ट्विट केले आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल एचएस पनाग यांनी ट्विट करून जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. हे लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. 


1. जनरल बिपिन रावत

2. मधुलिका रावत

3. ब्रिगेडियर एलएस लिडर

4. लेफ्टनंट के. हरजिंदर सिंग

5. नायक गुरसेवक सिंग

6. नायक. जितेंद्र कुमार

7. लान्स नाईक विवेक कुमार

8. लान्स नाईक बी. साई तेजा

9. हवालदार सतपाल

सापडलेले मृतदेह ८५% जळाले आहेत. 

Web Title: IAF Helicopter Crash: CDS General Bipin Rawat's condition is critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.