VIDEO : हरियाणातील पंचकुला येथे जग्वार लढाऊ विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:04 IST2025-03-07T18:03:33+5:302025-03-07T18:04:59+5:30

या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे, लढाऊ विमानाचा पायलट पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे उतरवण्यात यशस्वी झाला...

iaf jaguar fighter jet crashed near Baldwala village in the Morni Hills area in Panchkula Haryana | VIDEO : हरियाणातील पंचकुला येथे जग्वार लढाऊ विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात

VIDEO : हरियाणातील पंचकुला येथे जग्वार लढाऊ विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात


हरियाणातील पंचकुला येथे भारतीय हवाई दलाचे जग्वार हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात पायलट थोडक्यात बचावला आहे. यासंदर्भात हवाई दलाने दिलेल्या निवेदनानुसार, लढाऊ विमानाने अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. पंचकुलाच्या डोंगराळ भागात असलेल्या मोरनी येथील बालदवाला गावाजवळ हे विमान कोसळले. 

या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे, लढाऊ विमानाचा पायलट पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे उतरवण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.



सिस्टिममधील बिघाडामुळे विमान कोसळले -
सिस्टिममधील बिघाडामुळे संबंधित लढाऊ विमान कोसळले. पायलटने विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यापूर्वी, हे विमान जमिनिवर कुठल्याही वसाहतीपासून दूर अथवा निर्जन स्थळी नेले. असे भारतीय हवाई दलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे

Web Title: iaf jaguar fighter jet crashed near Baldwala village in the Morni Hills area in Panchkula Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.