हवाई दलाच्या IAF Jaguar विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटने वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 10:00 AM2019-06-27T10:00:42+5:302019-06-27T10:00:57+5:30
प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार सकाळी खूप मोठा आवाज ऐकायला आला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. विमान कोसळलं असं स्थानिक लोकांना वाटलं मात्र विमानाच्या इंधन टाकीचा काही भाग कोसळल्याचं पाहण्यात आलं
अंबाला - भारतीय हवाई दलाचं IAF Jaguar विमानाचा आज सकाळी अंबाला एअरबेस स्टेशनवर मोठा अपघात टळला. विमानाच्या इंधन टाकीला पक्षी धडकल्याने त्याला आग लागली आणि इंधनाच्या टाकीचा काही भाग जमिनीवर कोसळला. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत विमानाचं तातडीनं लॅंडिंग केले.
अंबाला हवाई क्षेत्राच्या हद्दीत ही घटना घडली. याठिकाणी कोणालाही जाण्याची परवानगी नाही. घटनास्थळी हवाई दलाचे अधिकारी पोहचले आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार सकाळी खूप मोठा आवाज ऐकायला आला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. विमान कोसळलं असं स्थानिक लोकांना वाटलं मात्र विमानाच्या इंधन टाकीचा काही भाग कोसळल्याचं पाहण्यात आलं. स्फोटाचा आवाज इतका होता की ज्या बलदेवनगर परिसरात इंधनाच्या टाकीचा भाग कोसळला तेथील घरांना तडे गेले. याआधीही 8 जून रोजी गोवा एअरपोर्टवर भारतीय नौदलाचे मिग 29 K विमानाच्या इंधनाची टाकी पडून विमान सेवेवर परिणाम झाला.
IAF Sources: An IAF Jaguar pilot jettisoned fuel tanks of his aircraft after one of the engines failed after being hit by a bird, pilot managed to land back safely at the Ambala air base. Small practice bombs jettisoned by his aircraft have also been recovered. pic.twitter.com/tXG3x1MDqR
— ANI (@ANI) June 27, 2019