IAF MiG-21 Aircraft Crash : जैसलमेरमध्ये भारत-पाक सीमेजवळ हवाई दलाचं MiG-21 विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 10:03 PM2021-12-24T22:03:24+5:302021-12-24T22:04:00+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅशदरम्यान विमान जमिनीवर कोसळल्याचा मोठा आवाज झाला. यानंतर, गावातील लोक सर्वप्रथम घठनास्थळी पोहोचले...
जैसलमेरमध्ये भारत-पाक सीमेजवळ हवाई दलाचे MiG21 विमान कोसळले आहे. ही घटना सुदाशिरी गावाच्या हद्दीत घडली. या अपघातात पायलटचा भाजल्याने मृत्यू झाला असून प्रशासन घटनास्थळी पोहोचत आहे. या घटनेबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही, मात्र पुढील तपास लवकरच सुरू होईल.
हे विमान नेमके कशामुळे क्रॅश झाले हा तपासाचा विषय आहे. मात्र, खराब हवामान होते, तांत्रिक बिघाड झाला होता, की आणखी काही कारणामुळे विमान कोसळले, यासंदर्भात हवाई दलाकडून तपशीलवार तपास केला जाईल. सध्या तरी, ही घटना भारत-पाकिस्तान सीमेजवळ घडली आणि या घटनेत पायलटला मृत्यू झाला एवढीच माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅशदरम्यान विमान जमिनीवर कोसळल्याचा मोठा आवाज झाला. यानंतर, गावातील लोक सर्वप्रथम घठनास्थळी पोहोचले. यानंतर माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनही घटना स्थळी पोहोचले. संबंधित वैमानिकाला वाचविण्याचाही प्रयत्न करण्यात आला, पण ते गंभीररित्या भाजले होते आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.