देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी, पगार फक्त 1 रुपये; कोण आहेत अमित कटारिया? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 04:43 PM2024-11-10T16:43:12+5:302024-11-10T16:45:18+5:30

IAS Amit Kataria : अमित कटारिया यांनी UPSC परीक्षेत देशातून 18वा क्रमांक मिळवला होता.

IAS Amit Kataria: Richest IAS officer in the country, salary only Rs 1; Who is Amit Kataria? Find out | देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी, पगार फक्त 1 रुपये; कोण आहेत अमित कटारिया? पाहा...

देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी, पगार फक्त 1 रुपये; कोण आहेत अमित कटारिया? पाहा...

IAS Amit Kataria : देशात अनेक IAS-IPS अधिकारी आहेत, जे नेहमी चर्चेत असतात. आम्ही तुम्हाला एका अशा IAS अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. विशेष बाब म्हणजे, ते महिन्याला फक्त 1 रुपये पगार घेतात. अमित कटारिया, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची संपत्ती कोटींमध्ये आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 1 रुपया पगार घेणारा अधिकारी श्रीमंत कसा? 

कोण आहेत IAS अमित कटारिया? 
IAS अमित कटारिया हरियाणातील गुरुग्रामचे रहिवासी असून, सध्या त्यांची पोस्टिंग छत्तीसगडमध्ये आहे. सुमारे 7 वर्षांच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन ते परतले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. अमित कटारिया अनेकवेळा चर्चेत आले आहेत. पीएम मोदींसोबतची भेट असो किंव फक्त 1 रुपये पगार घेणे असो. कटारियांची नेहमी चर्चा असते. नुकतीच त्यांची पोस्टिंग पुन्हा छत्तीसगडला करण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपयांची संपत्ती
अमित कटारिया हे व्यापारी कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबाचा मोठा रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचा व्यवसाय दिल्ली आणि आसपासच्या भागात पसरलेला आहे. हा व्यवसाय त्यांचे कुटुंबीय चालवतात. या व्यवसायातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळते. एका रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 2021 नुसार त्यांच्या पदावरील मूळ वेतन 56000 रुपये आणि इतर भत्त्यांसह 1.40 लाख रुपयांपेक्षा जास्त होते. पण, अमित कटारिया सरकारककडून फक्त 1 रुपये पगार घेतात. अमित यांनी पत्नी अस्मिता हांडा एक व्यावसायिक पायलट असून, त्यांचा पगारही लाखात आहे.

2003 साली UPSC उत्तीर्ण
अमित कटारिया यांनी IIT दिल्लीतून बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2003 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी UPSC मध्ये देशातून 18 वा क्रमांक मिळवला होता.  अमित कटारिया बस्तरचे जिल्हाधिकारी असताना प्रसिद्धीच्या झोतात आले होते. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बस्तर दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान मोदींना भेटताना गडद चष्मा घातला होता, जो सरकारी प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. यामुळे अमित कटारिया यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच, पुढे त्यांना बस्तरमधून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर दिल्लीला बोलावण्यात आले होते.

Web Title: IAS Amit Kataria: Richest IAS officer in the country, salary only Rs 1; Who is Amit Kataria? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.