भारीच! वडील रस्त्यावर कपडे विकायचे, लेकाने केली नेत्रदिपक कामगिरी; झाला IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 03:55 PM2024-01-20T15:55:34+5:302024-01-20T15:56:14+5:30

वडील चौथी शिकले होते. पण त्यांनी आपल्या चारही मुलांना चांगलं शिक्षण दिलं.

ias anil basak father used to sell clothes on streets but he cracked upsc and became officer | भारीच! वडील रस्त्यावर कपडे विकायचे, लेकाने केली नेत्रदिपक कामगिरी; झाला IAS अधिकारी

फोटो - zeenews

कठोर परिश्रम करून, अडचणी आणि अपयशाशी झुंज दिल्यानंतर जे मिळते तेच खरं यश असतं. IAS अनिल बसाक यांची अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ज्यांनी आपल्या समर्पणाने यशाचं शिखर गाठलं आहे. बसाकचे वडील बिनोद बसाक, जे मूळचे बिहारमधील किशनगंजचे रहिवासी होते, ते कापड विक्रेते होते, ते सायकलवरून गावोगावी कपडे विकायचे. 

वडील चौथी शिकले होते. पण त्यांनी आपल्या चारही मुलांना चांगलं शिक्षण दिलं. कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत असताना बसाक यांनी 2014 मध्ये प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला. अनिल बसाक आपल्या संघर्षमयी प्रवासाच्या आठवणी सांगताना म्हणाले की, "खरं सांगायचं तर माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती." 

"आयुष्यातला हा एक कठीण काळ होता ज्याने माझी परीक्षा घेतली आणि त्याचवेळी मला बळही दिलं. माझे वडील बातम्या पाहायचे त्यामुळे घरी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आजतकसह अनेक टीव्ही न्यूज चॅनेल पाहत असत. लहानपणापासून मी वर्तमान घडामोडींशी संबंधित अनेक घटनांचा न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून अभ्यास करत आलो. मला माहीत नव्हतं की मी कधी IAS अधिकारी होईन."

ग्रॅज्युएशननंतर अनिल यांनी आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे बालपणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची तयारी सुरू केली, परंतु 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा पास करू शकले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बसाक म्हणाले, "या परीक्षेसाठी मी माझ्या पहिल्याच प्रयत्नात खूप मेहनत केली, पण ती पास होऊ शकलो नाही. त्यानंतर आत्मपरीक्षण केलं आणि दुसऱ्या प्रयत्नात, त्याने 616 व्या क्रमांकासह UPSC परीक्षा उत्तीर्ण केली."
 

Web Title: ias anil basak father used to sell clothes on streets but he cracked upsc and became officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.