अभिमानास्पद! UPSC ची तयारी सुरू असतानाच आईचं निधन पण 'ती' खचली नाही; जिद्दीने IAS झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 05:33 PM2023-01-22T17:33:07+5:302023-01-22T17:39:13+5:30

यूपीएससीच्या तयारीदरम्यान अंकिता यांना त्यांच्या आईच्या निधनाची बातमी मिळाली. या घटनेने अंकिता खूप दु:खी झाल्या. पण त्यांनी हार नाही मानली. 

IAS Ankita Chaudhari Mother passed away during UPSC preparation still | अभिमानास्पद! UPSC ची तयारी सुरू असतानाच आईचं निधन पण 'ती' खचली नाही; जिद्दीने IAS झाली

अभिमानास्पद! UPSC ची तयारी सुरू असतानाच आईचं निधन पण 'ती' खचली नाही; जिद्दीने IAS झाली

Next

UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. कठोर परिश्रम करून हरियाणाच्या अंकिता चौधरी यांनी यश संपादन केलं आहे. हरियाणाच्या अंकिता यांनी 2017 मध्ये UPSC परीक्षा दिली, त्यांना यश मिळाले नाही, पण दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक 14 मिळवला आहे. 

अंकिता यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतला. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससीसाठी तयारी सुरू केली. मास्टर डिग्री मिळाल्यानंतर तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. मात्र यूपीएससीच्या तयारीदरम्यान अंकिता यांना त्यांच्या आईच्या निधनाची बातमी मिळाली. या घटनेने अंकिता खूप दु:खी झाल्या. पण त्यांनी हार नाही मानली. 

आयएएस अधिकारी होऊन त्यांनी आपल्या दिवंगत आईला श्रद्धांजली वाहिली. यामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप साथ दिली. अंकिता पहिल्यांदा यूपीएससी परीक्षेसाठी बसल्या तेव्हा त्यांना यश मिळाले नाही, त्यानंतर त्यांनी अनेक गोष्टी तपासल्या आणि त्यात सुधारणा केली. प्रत्येक वेळी उणीवा सुधारून तयारी आणखी मजबूत करता येते असा त्यांचा विश्वास आहे.

अंकिता चौधरी यांनी 2018 मध्ये दुस-यांदा UPSC ची परीक्षा रणनीती आणि दृढनिश्चयाने उत्तीर्ण केली. यावेळी अंकिता यांनी ऑल इंडिया रँक 14 मिळवला. अंकिता यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आपल्या वडिलांना आणि मेहनतीला दिलं आहे. परिक्षेसाठी मेहनत आणि सराव गरजेचा असल्याचा सल्ला त्यांनी इतर विद्यार्थ्यांना दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: IAS Ankita Chaudhari Mother passed away during UPSC preparation still

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.