तळघरात स्टोअरला होती परवानगी, पण लायब्ररी सुरू होती; अपघाताबाबत धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:42 AM2024-07-29T10:42:01+5:302024-07-29T10:44:29+5:30

काल दिल्लीत इमारतीत घुसलेल्या पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली, एका आयएएस अॅकडमीमधील तळघरात पाणी घुसल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

IAS coaching centre flooded case A store was allowed in the basement, but the library was open A shocking revelation about the accident | तळघरात स्टोअरला होती परवानगी, पण लायब्ररी सुरू होती; अपघाताबाबत धक्कादायक खुलासा

तळघरात स्टोअरला होती परवानगी, पण लायब्ररी सुरू होती; अपघाताबाबत धक्कादायक खुलासा

काल दिल्लीतील राव आयएएस स्टडी सर्कल या कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने शनिवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थिनी आणि एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी पोलिसांनी संस्थेचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंह यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कलमान्वये इमारत व्यवस्थापन आणि ड्रेनेज व्यवस्थेची देखभाल करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोचिंग सेंटर सील करण्यात आले आहे.

कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षासाठी ठरल्या 'लक्ष्मी'; एका आठवड्यात निवडणूक प्रचारातून २०० मिलियन डॉलर्स केले जमा

या घटनेवर दिल्लीचे राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी विभागीय आयुक्तांना मंगळवारपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एलजी म्हणाले की, जे काही घडत आहे ते अक्षम्य आहे आणि अशा समस्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुरक्षेची खात्री न करण्यामध्ये कोचिंग संस्था आणि जमीनदारांच्या भूमिकेचीही त्यांनी चौकशी केली.

दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात तान्या या विद्यार्थिनीची ओळख पटली. ती मूळची बिहारच्या औरंगाबादची. तिचे वडील तेलंगणात अभियंता आहेत.

रवींद्र सिंह यादव यांनी सांगितले की, रविवारी एफएसएल टीमने कोचिंग सेंटरमधून पुरावे गोळा केले आणि ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले. तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात पुष्टी झाली आहे.

सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाच फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यावेळी कोचिंग सेंटरच्या तळघरात सुमारे ३५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास काही मोठ्या वाहनांनी रस्त्यावर यू-टर्न घेतला असता तळघराच्या पायऱ्यांवरील काचेचा दरवाजा पाण्याच्या दाबाने तुटल्याने काही मिनिटांतच ही जागा पाण्याने भरून गेली. 

पाणी पाहून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ सुरू झाला

अचानक तळघरात पाणी आल्याने शॉर्टसर्किटमुळे वीजही गेली. दोन विद्यार्थिनी आणि एका मुलाचा आतमध्ये अडकून मृत्यू झाला. कोचिंग सेंटर चालकांनी आधी स्वतः परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती चिघळली तेव्हाच पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आले.

Web Title: IAS coaching centre flooded case A store was allowed in the basement, but the library was open A shocking revelation about the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :delhiदिल्ली