IAS Keerthi Jalli : कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS बोटीतून गावात पोहोचल्या; चिखलातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 03:36 PM2022-05-27T15:36:26+5:302022-05-27T15:44:36+5:30

IAS Keerthi Jalli : महिला अधिकारी पुरग्रस्त भागात पूर्ण निष्ठेसह आपलं काम करत आहेत आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलातून वाट काढत आहेत.

IAS Keerthi Jalli visit assam floods villages winning hearts online | IAS Keerthi Jalli : कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS बोटीतून गावात पोहोचल्या; चिखलातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या

फोटो - NBT

Next

नवी दिल्ली - आसाममध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. ASDMA ने सांगितलं की, सध्या 956 गावे पाण्याखाली गेली आहेत आणि संपूर्णआसाममध्ये 47,139.12 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अधिकारी सहा जिल्ह्यांमध्ये 365 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत. जिथे 13,988 मुलांसह 66,836 लोक आश्रयस्थानात आहेत. आतापर्यंत 1,243.65 क्विंटल तांदूळ, डाळी आणि मीठ, 5,075.11 लीटर मोहरीचे तेल, 300 क्विंटल पशुखाद्य आणि इतर पूर मदत सामग्रीचे वाटप करण्यात आलं आहे. याच दरम्यान एका महिला IAS अधिकाऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

कार्यालयात बसून बैठका घेण्याऐवजी महिला IAS अधिकारी बोटीतून गावात पोहोचल्या. चिखलातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला सर्वांनीच सलाम केला आहे. कीर्ती जल्ली (Keerthi Jalli) असं या महिला IAS अधिकाऱ्याचं नाव आहे. या महिला अधिकारी पुरग्रस्त भागात पूर्ण निष्ठेसह आपलं काम करत आहेत आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलातून वाट काढत आहेत. चिखलाने साडी भरलेल्या या महिला अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कीर्ती जल्ली सध्या आसाममधील कचार जिल्ह्यात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. 

कचार जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील त्यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूरग्रस्तांपर्यंत पोहोचून सर्वतोपरी मदत केल्याबद्दल या महिला अधिकाऱ्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. "स्थानिक लोकांनी सांगितलं की ते गेल्या 50 वर्षांपासून याच समस्येचा सामना करत आहेत. मला वाटलं की मला तिथे जाऊन वास्तविक समस्या पाहण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी त्याठिकाणी पाहणी करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पूर आलेला असतानाचा काळ" असं कीर्ती यांनी म्हटलं आहे. तसेच भविष्यात होणारं नुकसान कमी करता यावं, यासाठी गावाच्या सुरक्षेवर भर देणार असल्याचं उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितलं. 

जिल्ह्यातील उपायुक्त त्यांच्या गावी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. बराक नदीला आलेल्या पुरामुळे दरवर्षी येणाऱ्या समस्या त्यांनी सविस्तरपणे सांगितल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आसाममध्ये (Assam) पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत लाखो लोकं प्रभावित होत आहे. गुरुवारी पावसाशी संबंधित घटनेत आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी सरकारी आकडेवारीनुसार, 5.61 लाख लोक अजूनही पूरासारख्या परिस्थितीचा सामना करत आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, गुरुवारी नगाव आणि कामपूर येथे प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला.
 

Web Title: IAS Keerthi Jalli visit assam floods villages winning hearts online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.