वेब सीरिजमध्ये काम केलेले IAS अधिकारी अभिषेक सिंह निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 03:25 PM2023-02-09T15:25:50+5:302023-02-09T15:26:14+5:30

अभिषेक सिंह यांना 2022 च्या गुजरात निवडणुकीत निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते, परंतु कारसमोर उभे राहून फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले.

ias officer abhishek singh suspended for absent from duty without permission | वेब सीरिजमध्ये काम केलेले IAS अधिकारी अभिषेक सिंह निलंबित

वेब सीरिजमध्ये काम केलेले IAS अधिकारी अभिषेक सिंह निलंबित

Next

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांना न कळवता सतत रजेवर गेल्याने त्यांना निलंबित केले आहे. 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी अभिषेक सिंह हे नेहमी चर्चेत राहिले आहेत. दरम्यान, अभिषेक सिंह यांना 2014 मध्ये सुद्धा निलंबित करण्यात आले होते. अभिषेक सिंह यांची पत्नी दुर्गा शक्ती नागपाल देखील आयएएस आहे.

अभिषेक सिंह यांना 2022 च्या गुजरात निवडणुकीत निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते, परंतु कारसमोर उभे राहून फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले. त्यानंतर उत्तर प्रदेशात आल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला नाही. नियुक्ती विभागाने त्यांना नोटीसही पाठवली होती, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. स्पष्टीकरण न देता बेपत्ता आणि आचार नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान,आयएएस अभिषेक सिंह यांनी 2011 मध्ये यूपूएसी (UPSC) परीक्षेत 94 वा क्रमांक मिळविला होता. त्यांना उत्तर प्रदेश कॅडर मिळाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग कानपूर (ग्रामीण) येथे जॉइंट मॅजिस्ट्रेट म्हणून झाली. आयएएस झाल्यानंतरही अभिषेक सिंहची आवड अभिनय आणि संगीतात कायम राहिली. लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अभिषेक सिंह यांचे 30 लाख फॉलोअर्स आहेत. ते बी प्राकसोबत 'दिल तोड के' गाण्यात दिसून आले होते. याशिवाय त्यांनी जुबिन नौटियालच्या 'तुझे भूलना तो चाहता...' या गाण्यातही काम केले होते. तसेच, नेटफ्लिक्सवरील सिरिजमध्येही ते दिसून आले होते.

योगी सरकारच्या कार्यकाळात 'या' आयएएस अधिकाऱ्यांचे निलंबित
- जितेंद्र बहादूर सिंह यांना जून 2018 मध्ये डीएम गोंडा या पदावर असताना निलंबित करण्यात आले होते.
- कुमार प्रशांत फतेहपूरचे डीएम असताना त्यांना जून 2018 मध्ये निलंबित करण्यात आले होते.
- देवेंद्र कुमार पांडे यांना उन्नावमध्ये डीएम असताना फेब्रुवारी 2020 मध्ये निलंबित करण्यात आले होते.
- टीके शिबू यांना 31 मार्च 2022 रोजी सोनभद्रच्या जिल्हा दंडाधिकारी पदावरून निलंबित करण्यात आले होते.
- सुनील कुमार वर्मा यांना 4 एप्रिल 2022 रोजी औरैयाच्या जिल्हा दंडाधिकारी पदावरून निलंबित करण्यात आले होते.

Web Title: ias officer abhishek singh suspended for absent from duty without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.