महिला अधिकाऱ्याला वाचविताना IAS अधिकाऱ्याचा मृत्यू
By admin | Published: May 30, 2017 12:21 PM2017-05-30T12:21:39+5:302017-05-30T12:55:10+5:30
दक्षिण दिल्लीच्या बेरसराय भागात सहकारी महिला अधिकाऱ्याला स्विमिंग पूलमध्ये बुडण्यापासून वाचवायला गेलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30- दक्षिण दिल्लीच्या बेरसराय भागात सहकारी महिला अधिकाऱ्याला स्विमिंग पूलमध्ये बुडण्यापासून वाचवायला गेलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोनीपतमध्ये राहणारे 30 वर्षीय आशीष दहिया भारतीय प्रशासकीय सेवेत 2016मध्ये रूजू झाले होते. सोमवारी संध्याकाळी आपल्या काही मित्रांना भेटण्यासाठी ते सराय इथल्या फॉरेन सर्व्हिस इन्टिट्यूटमध्ये गेले होते. तेथील स्विमिंग पुलजवळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी सुरू असताना सगळ्यांनी स्विमिंग पुलमध्ये पोहायला जाण्याचं ठरवलं होतं. घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पार्टीमध्ये सगळे अधिकारी मद्यपान करत होते.
स्विमिंग पुलजवळ पार्टी सुरू असताना एक महिला अधिकारी पाय घसरून पुलमध्ये पडली. तीला वाचविण्यासाठी आशिष दहिया यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी पुलमध्ये धाव घेतली. त्या महिला अधिकाऱ्याला पुलमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं पण तेव्हा आशिष बेपत्ता झाल्याचं त्याच्या मित्रांच्या लक्षात आलं होतं. पण तेव्हाच स्विमिंग पुलमध्ये तरंगताना आशिष त्यांच्या मित्रांना दिसला. आशिय दहिया यांना बाहेर काढून उपचार करण्यात आले होते. तेथिल स्टेशन मेडिकल ऑफिसर डॉ. प्रम्येश बसाल यांना बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आशिष दहिया यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे.
दरम्यान या प्रकरणाची पुढची चौकशी आता पोलिसांकडून केली जाते आहे.