कडक सॅल्युट! हॉस्पिटलमध्ये काम करून गुपचुप केली UPSC ची तयारी; आता गाठलं यशाचं शिखर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 06:23 PM2023-02-08T18:23:48+5:302023-02-08T18:24:35+5:30
IAS Success Story: आयएएस ऑफिसर नागार्जुन गौडा यांनी यशाचे शिखर गाठून तरूणाईसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
IAS Nagarjuna success story | मुंबई : ज्या लोकांचे इरादे मजबूत असतात त्यांचा कधीच पराभव होत नाही. याचाच प्रत्यय देणारी कहाणी आयएएस ऑफिसर नागार्जुन गौडा यांची आहे. नागार्जुन यांचा जन्म कर्नाटकातील एका छोट्या गावात झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी अभ्यास थांबवला नाही आणि एक दिवस मेहनतीने एमबीबीएसची (MBBS) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि कुटुंबाला मदत करण्यासाठी रुग्णालयात नोकरी करत असतानाच आयएएसची (IAS) तयारी करत राहिले. नोकरी करण्यासोबत UPSC ची तयारी करता येत नाही असे अनेकांचे म्हणणे असते. पण नागार्जुन यांनी याला खोटे ठरवले.
गरिबीतून गाठले यशाचे शिखर
नागार्जुन यांचा जन्म कर्नाटकातील एका लहानश्या गावी झाला होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत होती. तरीही त्यांनी जिद्द बाळगली आणि आपला अभ्यास करणे सुरूच ठेवले. त्यांनी कठोर परिश्रम केले आणि इंटरमीडिएटनंतर एमबीबीएस प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर एमबीबीएसला प्रवेश घेतला. एमबीबीएस झाल्यावर हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. त्यासाठी त्यांनी रुग्णालयात काम सुरू केले. दरम्यान, त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती आणि घरात कमावणारे कोणी नव्हते. त्यामुळे यूपीएससीच्या तयारीसोबतच ते नोकरी देखील करत होते.
नोकरी करत केली UPSCची तयारी
नोकरी करत असताना रोज 7-8 तास अभ्यासासाठी देणे इतके सोपे नाही. त्यांचे म्हणणे आहे की जर तुम्ही चांगली रणनीती आखली आणि अभ्यासासाठी दररोज इतका वेळ काढला तर तुम्ही नोकरी करण्याबरोबरच परीक्षेची तयारी करून त्यात उत्तीर्ण होऊ शकता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"