'तिने' करून दाखवलं! IAS होण्यासाठी 6 महिने स्वतःला खोलीत बंद केलं अन् अभ्यासात झोकून दिलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:23 PM2022-12-22T15:23:21+5:302022-12-22T15:35:42+5:30
आयएएस अधिकारी निधी सिवाच यांचा प्रवास हा असाच प्रेरणादायी आहे. त्यांनी UPSC परीक्षा पास होण्यासाठी 6 महिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आणि अभ्यास केला.
UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे आणि जे ही परीक्षा उत्तीर्ण करतात त्यांना IAS अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. इच्छुक उमेदवार UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि त्यापैकी काही त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी खरोखर कठोर परिश्रम करतात. आयएएस अधिकारी निधी सिवाच यांचा प्रवास हा असाच प्रेरणादायी आहे. त्यांनी UPSC परीक्षा पास होण्यासाठी 6 महिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आणि अभ्यास केला.
निधी यांच्या घरच्यांची इच्छा होती की त्यांनी लग्न करावं. एकतर यूपीएससी पास कर किंवा लग्न कर अशी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. निधी यांनी कुटुंबाची ही अट मान्य केली. त्यांनी ठरवले की यावेळी आपल्याला आयएएसची परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. निधी सिवाच यांना त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले कारण त्यांनी 2018 मध्ये तिसर्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 83 ची ऑल इंडिया रँक मिळवली.
निधी यांची आयएएस पदासाठी निवड झाली. निधी सिवाच या हरियाणातील गुरुग्रामच्या रहिवासी आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत त्याने 95 टक्के आणि 90 टक्के गुण मिळवले होते. त्या दीनबंधू छोटूराम युनिव्हर्सिटी, सोनीपत, हरियाणा येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलेलं आहे.
इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर निधी, टेक महिंद्रामध्ये डिझाईन इंजिनीअर म्हणून काम करण्यासाठी हैदराबादला गेल्या. परंतु 2017 मध्ये नोकरी सोडली आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. निधी यांनी पर्यायी विषय म्हणून इतिहास आणि पर्यायी माध्यम म्हणून इंग्रजी निवडले. निधी यांनी पर्यायी विषय म्हणून इतिहास निवडण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनी सांगितले की त्यांच्या नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमाने खूप मदत केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"