कौतुकास्पद! IAS ऑफिसरनं दाखवले आपले CBSE बोर्डाच्या परीक्षेचे निकालपत्रक अन् म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 09:27 AM2020-07-15T09:27:45+5:302020-07-15T11:19:57+5:30
अहमदाबादचे पालिका उपायुक्त नितीन सांगवान यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. आयएएस नितीन सांगवान यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेत आपले गुण या पोस्टच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
नवी दिल्लीः सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात अनेक मुलांनी चांगले गुण संपादन केले आहेत. तर काहींना अपेक्षित गुण मिळालेले नाहीत. बर्याचदा अशा परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेली मुलं स्वतःमध्ये उणिवा शोधत राहतात. ज्या मुलांचे चांगले गुण येतात, त्यांना कुटुंब आणि समाजात खूप प्रेम मिळते. दुसरीकडे कमी गुण आणणा-या मुलांना वाईट वाटून त्यांच्या मानसिक आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून लोक आणि पालक त्यांची समजूत काढतात. याच दरम्यान ट्विटरवर अहमदाबादचे पालिका उपायुक्त नितीन सांगवान यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. आयएएस नितीन सांगवान यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेत आपले गुण या पोस्टच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
नितीन सांगवान यांनी ट्विटर हँडलवर आपले बारावीचे मार्कशीट शेअर करताना लिहिले आहे की, बारावीच्या परीक्षेत केमिस्ट्रीमध्ये मला 24 गुण मिळाले. उत्तीर्ण गुणांपेक्षा केवळ 1 गुण अधिक आहे. पण मला आयुष्यात काय हवे होते, हे त्यामुळे सिद्ध झालेले नाही. मुलांनो गुणांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका. बोर्डाच्या निकालांपेक्षा आयुष्य मोठे आहे. टीका नव्हे, तर आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये झाकून पाहा.
In my 12th exams, I got 24 marks in Chemistry - just 1 mark above passing marks. But that didn't decide what I wanted from my life
— Nitin Sangwan, IAS (@nitinsangwan) July 13, 2020
Don't bog down kids with burden of marks
Life is much more than board results
Let results be an opportunity for introspection & not for criticism pic.twitter.com/wPNoh9A616
2016च्या बॅचमध्ये निवड झालेले नितीन सांगवान यांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सुवर्णपदकाने गौरविण्यात आले आहे. नितीन यांना कुशल नेतृत्व क्षमता, समूहकार्य कौशल्य आणि सहयोग भाव यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार नागरी सेवा प्रशिक्षणादरम्यान दिला जातो. नितीन सांगवान यांना मसुरी येथील फाऊंडेशन कोर्स संपल्यानंतर गुजरात केडरमध्ये नियुक्त करण्यात आले होते. सुवर्णपदक घेताना नितीन म्हणाले की, कोणताही रस्ता तरुणांसाठी कठीण नाही. कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीद्वारे लक्ष्य सहज मिळवता येते.
नितीन सांगवान यांनी जेव्हा पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली, तेव्हा त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांना दुस-यांदा यश मिळालं, पण अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेले नव्हते. म्हणूनच सांगवानने तिस-यांदा नागरी सेवा परीक्षा दिली आणि इच्छित यश संपादित केले. पण यानंतरही सांगवान यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करून चांगला रँक मिळविला. हरियाणाच्या चरखी दादरी येथून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागरी सेवेची तयारी करण्यापूर्वी नितीन सांगवान यांनीही काही ठिकाणी काम केले होते.
हेही वाचा
चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले
बोगस रेशन कार्डवर आता मिळणार नाही तांदूळ अन् गहू; 'अशा' पद्धतीनं वगळलं जाणार नाव
NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...
20 लाख रुपये किलोनं विकला जातो भारतातील 'हा' किडा, पण चीननं सगळा 'राडा' केला!
अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर