IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 02:45 AM2023-09-16T02:45:21+5:302023-09-16T02:47:16+5:30
टीना डाबी जुलै 2022 मध्ये राजस्थानमधील जैसलमेरच्या कलेक्टर बनल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मॅटर्निटी लिव्हवर होत्या.
आयएएस टीना डाबी आता आई बनल्या आहेत. जयपूर येथील रुग्णालया त्यांनी आज मुलला जन्म दिला. आयएएस दाम्पत्य टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या घरात नवा पाहुना आल्याने, दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 2015 IAS बॅचमधील टॉपर आणि राजस्थान कॅडरमधील अधिकारी टीना डाबी जुलै 2022 मध्ये जैसलमेर जिल्हाधिकारी बनल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मॅटर्निटी लिव्हवर होत्या.
प्रेग्नन्सीमुळे टीना डाबी यांनी राज्य सरकारकडे जयपूरमध्ये नाॅन फील्ड पोस्टिंग देण्यासंदर्भात मांगणी केली होती. यानंतर त्या मॅटरनिटी लीव्हवर गेल्या होत्या. टीना यांनी आयएएस अधिकारी प्रदीप गवांडे यांच्यासोबत 2022 मध्ये लग्न केले होते. यानंर टीना बऱ्याच चर्चेत आल्या होत्या.
पाकिस्तानच्या वृद्ध महिलेनं दिला होता आशीर्वाद -
जैसलमेर जिल्हाधिकारी म्हणून टिना डाबी यांनी आपल्या कार्यकाळात पाकिस्तानातून आलेल्या हिंदू विस्थापितांचे जैसलमेरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी बरेच काम केले आहे. विस्थापितांना घरे बांधण्यासाठी जमीन मिळवून देण्याबरोबरच, त्यांच्या खाण्या-पिण्याची आणि राहण्याची व्यवस्थाही त्यांनी केली होती.
टीना यांच्या या कामाबद्दल पाकिस्तानातील विस्तापित महिलांनी त्यांचे बरेच कौतुक केले होते. यावेळी एका महिलेने IAS टीना यांना पुत्ररत्न होण्याचा आशिर्वादही दिला होता. यावर हसत-हसत, आपण मुलगा-मुलगी असा भेद करत नाही, असे टीना डाबी यांनी म्हटले हेते.