प्रेरणादायी! गावी शिक्षण घेतलं, बँकेत नोकरी लागली अन् आता झाली IAS, नवऱ्याने दिला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 12:44 PM2023-10-06T12:44:39+5:302023-10-06T12:45:28+5:30
आयएएस पुष्पलता यांनी यूपीएससी परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून यश संपादन केलं आहे.
नागरी सेवा परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. काहींना पास व्हायला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो तर काही लोक कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय पास होतात. UPSC सारखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. आयएएस पुष्पलता यांनी यूपीएससी परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून यश संपादन केलं आहे.
IAS पुष्पलता यादव या मूळच्या हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खुसबुरा या छोट्याशा गावातील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर बीएस्सी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले. पुष्पलता यांनी दोन वर्षे खासगी क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून त्यांची निवड झाली.
लग्नानंतर यूपीएससीची सुरू केली तयारी
लग्न केलं आणि मानेसरला राहू लागल्या. त्यांचा मुलगा 2 वर्षांचा असताना त्यांनी नागरी सेवा परीक्षेला बसण्यासाठी पुन्हा शिक्षण घेण्याता विचार केला. यूपीएससीचा पेपर लिहिण्यासाठी त्यांनी जवळपास 4 वर्षे तयारी केली आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. शेवटी त्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा पेपर क्लियर करण्यात यशस्वी झाल्या.
तिसर्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण
पतीने त्यांच्या मुलाची काळजी घेतली जेणेकरून त्यांची पत्नी परिक्षेवर लक्ष केंद्रित करू शकेल. त्या पहाटे चार वाजता उठायच्या आणि काही वेळ अभ्यास करायच्या आणि नंतर मुलाला शाळेत पाठवायच्या आणि तो गेल्यावरही अभ्यास करायच्या. शाळेतून आल्यावर त्याला झोपवून अभ्यास करायच्या. दोनदा अपयशी ठरल्या पण त्यामुळे निराश झाल्या नाही. त्यानी अभ्यास सुरू ठेवला आणि आणखी लक्ष केंद्रित केलं. तिसर्या वर्षी शेवटी परीक्षा उत्तीर्ण केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.